Uncategorizedमहाराष्ट्र ग्रामीण
नागोठण्यातील जैन मंदिराचा अंजनशलाका प्रतिष्ठापना महोत्सव उत्साहात संपन्न
ऐतिहासिक नागोठण्याच्या शिरेपेचात आणखी एक मानाचा तुरा

नागोठण्यातील जैन मंदिराचा अंजनशलाका प्रतिष्ठापना महोत्सव उत्साहात संपन्न
ऐतिहासिक नागोठण्याच्या शिरेपेचात आणखी एक मानाचा तुरा
महेश पवार
नागोठणे : नागोठणे शहरातील १५० वर्ष जुने असलेल्या मूलनायक श्री चंद्रप्रभस्वामी मंदिराचा जीर्णोद्धार व अंजनशलाका प्रतिष्ठापना
महोत्सव मोठ्या थाटा माटात संपन्न झाला. हा
संपूर्ण कार्यक्रम आचार्य श्रीमद् विजय देवकीर्ती सूरीश्वरजी महाराज, प.पू. पन्यास रत्नकीर्ती विजय गणी यांच्यासह श्रमण – श्रमणी वृंद यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात दिनाक २४ जानेवारी रोजी नागोठणे नगरीत गुरु महाराज व त्यांचे शिष्य गण यांचे भव्य स्वागत करून झाली. तर या महोत्सवाची सांगता दि. ९ फेब्रुवारीला झाली. सुमारे १५ दिवस चाललेल्या या उत्सवात संपूर्ण जैन समाजाने आपले सर्व व्यवसाय बंद ठेवून या महोत्सवात सहभाग घेतला.

या कार्यक्रमात सर्व देवी देवतांचे विधिवत पूजन करण्यात आले. देवतांचा मुख्य प्राण प्रतिष्ठापना सोहळा दि. ७ फेब्रुवारीला पार पडला. याप्रसंगी संपूर्ण नागोठणे गावातील नागरिकांनी ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता प्रांगणात प्रसादाचा लाभ घेतला. या लाभाचे मानकरी स्व. रुपीबाई भिकमचंदजी परिवार हे होते. जैन प्रतिष्ठा कार्यक्रमात शाही करबाचे आयोजन केले होते. त्याचा लाभ श्रीमती विजयाबाई प्रेमचंदजी कंकू चोपडा (प्रकाश ज्वेलर्स) परिवाराने घेतला. प्रतिष्ठापना महोत्सवात मुख्य कार्यक्रम आजीवन ध्वजारोहणाचा लाभ स्व. दलीचंद वाघजी परमार परिवारने घेतला. यावेळी हेलिकॉप्टर मधून मंदिरावर पुष्पवृष्टी जुगनभाई प्रतापमालजी परमार व त्यांच्या परिवाराने केली. संपूर्ण उत्सवात सहभागी झालेल्या कुटुंबांचे बहुमान करण्याचा लाभ लीलाबाई चंपालालजी मुथा परिवारने घेतला होता. सदर कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये जयजिनेंद्रचा लाभ स्व. डायजी उमाजी मंडलेचा परिवाराने घेतला.
मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुमारे १२ वर्षे जीर्णोद्धार समितीचे मुख्य सिव्हिल इंजिनियर सुरेश ओटरमल व त्यांचे सहकारी सुभाष हरकचंद, सुरेश पोरवाल, भरत पितानी, राजेंद्र पिताणी, राकेश चंपालाल, दिलीप देवीचंद, निलेश मांगीलाल, रितेश दोशी, विजय चंपालाल, भरत मांगीलाल, प्रवीण कावेडिया, सुभाष ओटरमल, अरविंद देवीचंद यांनी मॅनेजिंग ट्रस्टी प्रकाश सरेमलजी व जुगराज प्रतापमलजी, सदस्य नरेंद्र प्रतापमलजी, किशोर ओटरमलजी, प्रकाश भिकमचंद, रमेश पिताणी,
सोहनलाल ओटरमलजी, गुणवंत परमार, प्रवीण नेनमाल, अभय घिसुलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
या महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून खा. सुनील तटकरे, ना. भरत गोगावले, ना. आदितीताई तटकरे, माजी खासदार अनंत गीते, आ. रवीशेठ पाटील, रिलायन्स कंपनीचे नागोठणे युनिटचे अध्यक्ष श्री. गोयल साहेब यांनी मंदिरात येऊन दर्शन घेतले.