महाराष्ट्र ग्रामीण

चोरीच्या गुन्ह्यात नागोठणे पोलिसांची दबंग कामगिरी

चार तासात महिला आरोपीचा घेतला शोध 

चोरीच्या गुन्ह्यात नागोठणे पोलिसांची दबंग कामगिरी

चार तासात महिला आरोपीचा घेतला शोध 

महेश पवार 
नागोठणे : चोरी करण्यात आलेल्या मौल्यवान दागिन्यांसह फरार झालेल्या महिला आरोपीला अवघ्या चार तासात मुद्देमालासह जेरबंद करण्याची दबंग कामगिरी नागोठणे पोलिसांच्या पथकाने नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. नागोठणे पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे नागोठणे शहरासह संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे.
या संदर्भात नागोठणे पोलीस ठाण्यातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार बेणसे (ता. पेण) गावाच्या लगत असलेल्या रिलायन्स कंपनीच्या निवासी संकुलातील जुना बी ३० या इमारतीमध्ये राहणाऱ्या मनाली मिलिंद सहस्त्रबुद्धे यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश केला होता. त्यावेळी सहस्त्रबुद्धे यांची मुलगी एका बेडरूम मध्ये झोपलेली असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने दुसऱ्या बेडरूम मध्ये प्रवेश करून बेडरूम मधील कपाटातील लॉकर मधील सोन्याचे एक सरी मंगळसूत्र व त्याला असलेल्या दोन सोन्याच्या छोट्या वाट्या, सोन्याचे असलेले कानातील झुमक्याची जोड, जास्वंद फुलाच्या आकाराचा एक मोठा चांदीचा आहार व लहान चांदीचे फुल असलेला छोटा हार, दोन जोडी चांदीचे पैजण अशा विविध प्रकारचे सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा सुमारे १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला होता. चोरीची ही घटना ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास घडली होती.
रिलायन्स निवासी संकुलातील या चोरीच्या घटनेची माहिती नागोठणे पोलिसांना मिळतात सोपोनि सचिन कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार प्रमोद कदम, पोलीस हवालदार महेश लांगी,  पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश हंबीर यांनी तात्काळ तेथील काम करणारे व इतर लोकांकडे चौकशी करून त्या आधारे अज्ञात आरोपी महिलेचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले. 
सदर महिलेकडे संबंधित चोरीच्या गुन्ह्याबाबत चौकशी केली असता तिने चोरीची कबुली दिली.  चोरीच्या या घटनेत चोरीस गेलेले रुपये १ लाख, ४० हजार किमतीचे सर्व सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करून सदरचा गुन्हा नागोठणे पोलिसांच्या पथकाने उघडकीस आणला आहे. याबाबत नागोठणे पोलीस ठाण्यात महिला आरोपी विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!