महाराष्ट्र ग्रामीण
बाहेरशिव येथील रिलायन्स मोबिलिटी सीएनजी पंपाचे उद्घाटन
मुंबईकडे जाणाऱ्या नागोठणेकर वाहन चालकांना सुविधा

बाहेरशिव येथील रिलायन्स मोबिलिटी सीएनजी पंपाचे उद्घाटन
मुंबईकडे जाणाऱ्या नागोठणेकर वाहन चालकांना सुविधा
महेश पवार
नागोठणे : नागोठण्याजवळील बाहेरशिव(पळस) येथील रिलायन्स बी पी मोबिलिटी सीएनजी पंपाचे उद्घाटन बुधवारी (दि.१२) सकाळी पळस ग्रामपंचायतीच्या सरपंच निष्ठा विचारे, नागोठण्याच्या सरपंच सुप्रियाताई महाडिक तसेच उपस्थित अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महानगर गॅस कंपनीचे सहकार्याने हा सीएनजी पंप सुरू करण्यात आला आहे. नागोठणे शहर व उत्तर नागोठणे विभागातील वाहन चालकांना मुंबईकडे जाण्यासाठी हा जवळचा सीएनजी पंप सुरू झाल्याने वाहन चालकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

बाहेरशिव(पळस) येथील या रिलायन्स सीएनजी पंपाचे उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादीचे विभागीय नेते शिवरामभाऊ शिंदे, समदशेठ अधिकारी, नागोठण्याचे माजी सरपंच विलास चौलकर, माजी सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, पंपाचे चालक जाहिद अधिकारी व शब्बीरभाई पानसरे यांच्यासह महानगर गॅस कंपनीचे एरिया मॅनेजर सुमित शेडगे, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर ओंकार वाघमारे, काँग्रेसचे नागोठणे शहराध्यक्ष अशपाकभाई पानसरे, मारुती शिर्के, नाजिमशेठ नाळखंडे, सगीर अधिकारी, गुलजार अधिकारी, इंतिखाब अधिकारी, सुधाकर जवके,

सिराजभाई पानसरे, विक्रांत घासे, ज्ञानेश्वर साळुंखे, प्रकाश कदम, सतीश डाकी, प्रतीक्षा घासे – चंदने, सुप्रिया माळी – डाकी, आसिफ मुल्ला, आसिफ अधिकारी, गुल्लू पाटणकर, खुर्शीद अधिकारी, अर्शद अधिकारी, पप्पूशेठ अधिकारी, आसिफ अधिकारी, समीर भिकन, इकबाल पानसरे, एजाज अधिकारी, सलीम हाफिज, रमीज दफेदार, आदिल पानसरे, अल्ताफ पोत्रिक, तात्या पोत्रिक आदींसह अनेक मान्यवर व नागरिक यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांनी सीएनजी गॅस पंपाचे चालक जाहीद अधिकारी व शब्बीरभाई पानसरे यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.