महाराष्ट्र ग्रामीण
गोडसई येथे हजरत सय्यद बालेपीर शाहबाबा यांच्या उर्सचे आयोजन
रविवारी होणार कव्वालीचा मुकाबला

गोडसई येथे हजरत सय्यद बालेपीर शाहबाबा यांच्या उर्सचे आयोजन
रविवारी होणार कव्वालीचा मुकाबला
महेश पवार
नागोठणे : नागोठण्याजवळील पाटणसई ग्रामपंचायत हद्दीतील गोडसई येथे दरवर्षी प्रमाणे हजरत सय्यद बालेपीर शाहबाबा यांचा उर्सचे आयोजन यावर्षी शनिवार दि. १५ फेब्रुवारीला करण्यात आले आहे. तर रविवार दि.१६ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता मुंबई मधील प्रसिद्ध कव्वाल, किंग ऑफ गझल अझीम नाझा व मुंबई मधीलच प्रसिद्ध कव्वाल, किंग ऑफ गझल मुराद आतिश यांच्यात कव्वालीचा सामना रंगणार असल्याची माहिती या कार्यक्रमाचे आयोजक दिलावरभाई मांडलेकर व अलिमभाई मांडलेकर यांनी दिली.

या ६१ व्या उर्स उत्सवात मिठाईच्या दुकानांसह, विविध प्रकारची खेळण्यांची दुकाने, आकाश पाळणे, लहान मुलांसाठी इतर खेळाचे साहित्य या ऊर्स मध्ये ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरातील सर्व नागरिकांनी, मुलांनी यामध्ये सहभाग घेऊन उर्सची शोभा वाढवावी असे आवाहन दर्गाचे तत्कालीन पुजारी पै.लियाकतबाबा मांडलेकर यांचे सुपुत्र दिलावरभाई मांडलेकर व अलिमभाई मांडलेकर यांनी केले आहे.
गोडसई येथील उर्स उत्सव यशस्वी करण्यासाठी दिलावरभाई मांडलेकर, अलिमभाई मांडलेकर, जहुर मांडलेकर, सदानंद गायकर, लियाकतशेठ कडवेकर, दिलीप मोदी, सिराजभाई पानसरे, असिफ मुल्ला, तसऊर अधिकारी, गुलजार सिंदी, रऊफ कडवेकर, इकबाल सिंदी, मन्सूर मुजावर, मुजफ्फर कडवेकर, कदिर रिफाई, उमेर सांगडे, तुफील कडवेकर, आदींसह उर्स कमिटीचे गोडसई, वाकण, पाटणसई येथील पदाधिकारी व सर्व सदस्य मेहनत घेत आहेत.