कुरनाड येथे अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सव सोहळ्याचे आयोजन
सुवर्ण महोत्सवा निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम

कुरनाड येथे अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सव सोहळ्याचे आयोजन
सुवर्ण महोत्सवा निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम
दिनेश ठमके
सुकेळी : पेण तालुक्यातील श्री. क्षेत्र कुरनाड येधे स्वानंद सुखनिवासी संत श्री. सदगुरू स्वामी तपो. गणेशनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व सदगुरु तपो. अरविंदनाथ महाराज यांच्या प्रेरणेने सालाबादप्रमाणे यावर्षीही गुरुवार दि. १३ व शुक्रवार दि.१४ फेब्रुवारी रोजी ५० व्या वर्षानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सव सोहळा साजरा होणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.
या दैनंदिन कार्यक्रमांमध्ये काकड आरती, ज्ञानेश्वरी वाचन, प्रवचन, हरिपाठ, किर्तनसेवा व जागर होणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवात आकेश दिवेकर व दांपत्य यांच्या हस्ते मुर्तीस अभिषेक, कळश स्थापना जगदिश मनवे, ध्वजारोहण राकेश खाडे, विणा पुजन राजु पवार , ज्ञानेश्वरी पुजन संदिप दिवेकर तसेच या कार्यक्रमाचे पौराहित्य कासु येथील किरणकाका वेखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. तसेच गुरुवारी सांय. ४ ते ५ या वेळेत ह.भ.प. गजानन महाराज कदम (कोंढवी), संत श्री. तपो. सदगुरू स्वामी अरविंदनाथ महाराज (देवाची आळंदी) यांचे प्रवचन, श्री.मरीआई हरिपाठ मंडळ वांगणी यांचे हरिपाठ व ह. भ.प. नंदकुमार महाराज कालेकर ( दापोली) यांची किर्तन सेवा होणार आहे. रात्री ज्ञानराज भजन मंडळ पाबळ यांच्या हरिजागरचे आयोजन करण्यात आले आहे.
दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि.१४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० ते ११.३० वा. ह.भ.प.जनार्दन महाराज शिंदे (कोंढवी) यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर उपस्थित सर्व भाविकांना कुरनाड ग्रामस्थांच्यावतीने महाप्रसाद देऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. गणेशनाथ महाराज संस्थान, ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ, जय हनुमान क्रिकेट संघ कुरनाड – पेण मेहनत घेत आहेत.