महाराष्ट्र ग्रामीण
नागोठणे एस. टी. स्थानकातील श्री सत्यनारायणाची महापूजा उत्साहात संपन्न

नागोठणे एस. टी. स्थानकातील श्री सत्यनारायणाची महापूजा उत्साहात संपन्न
महेश पवार
नागोठणे : राज्य परिवहन महामंडळाच्या रोहा आगारा अंतर्गत असलेल्या नागोठणे एस. टी. स्थानकातील श्री सत्यनारायणाची महापूजा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सोमवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडली. या महापूजेसाठी रोहा आगाराचे सहाय्यक वाहतूक अधिक्षक अजिंक्य रोहेकर, आगारातील सहाय्यक वाहतूक नियंत्रक अनिल म्हात्रे, लेखापाल विकास खाडे, वरिष्ठ लिपिक संदीप गायकवाड, कामगार संघटनेचे विभागीय सचिव गणेश शेलार, हेमंत कदम, वाहतूक नियंत्रक विलास शेठ, माजी वाहतूक नियंत्रक रघुनाथ खाडे, चंद्रकांत भोईर, माजी वाहक बळीराम बडे, माजी चालक खेळू भोय, रामवाडी येथील विभागीय कार्यालयातील सागर भोईर, सागर ढाणे, वाहक शरद नागोठणेकर व अन्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

ही महापूजा गणेश लांगी यांच्या हस्ते पार पडली. महापूजेनंतर विभागातील चोळेटेप येथील श्री दत्तकृपा प्रसादिक भजन मंडळ यांच्यातर्फे बुवा दिनेश पाटील, पखवाज वादक संजय तळेकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे संगीत भजन सादर झाले. पूजेनिमित्त अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. तसेच या पूजेनिमित्त नागरिकांसाठी महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली होती.
या महापूजेनिमित्त भारतीय परिवहन मंडळाच्या आंध्र प्रदेश मध्ये विशाखापटनम या ठिकाणी झालेल्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये संपूर्ण देशात प्रथम क्रमांक आल्याबद्दल वाहक केशव बांगरा यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे दानशूर व्यक्तिमत्व असलेले स्थानकातील श्री जोगेश्वरी पार्किंगचे मालक विपुलशेठ हेंडे, रसवंतीगृहाचे मालक राजकुमार गुप्ता, प्रिन्स टेलर, अजित एम्पोरियमचे मालक अजितशेठ जैन, जनरल स्टॉलचे चौधरी शेठ, गणेश फ्लॉवर मार्ट यांचा सन्मान करण्यात आला.
नागोठणे स्थानकातील ही महापूजा पार पाडण्यासाठी नागोठणे स्थानकाचे वाहतूक नियंत्रक प्रसाद पाटील, गणेश लांगी तसेच नागोठणे विभागात काम करणारे कर्मचारी दिनेश पाटील, केशव बांगरा, निलेश डाकी, राकेश चंदने, कल्पक म्हात्रे, समीर चंदने तसेच सर्व महिला कर्मचारी, सफाई कर्मचारी तसेच स्थानकातील सर्व परवानाधारक तसेच त्यांचे कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.