महाराष्ट्र ग्रामीण

नागोठण्यात सय्यद फान्नूल शहा बाबा यांचा उरूस उत्साहात 

नाशिक ढोलाच्या सहाय्याने संदलची मिरवणूक 

नागोठण्यात सय्यद फान्नूल शहा बाबा यांचा उरूस उत्साहात 

नाशिक ढोल च्या सहाय्याने संदलची मिरवणूक 
महेश पवार
नागोठणे : नागोठण्यातील शासकीय विश्राम गृह परिसरातील सय्यद फान्नूल शहा बाबा यांचा उरूस शुक्रवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अनेक मुस्लिम बांधवांनी सय्यद फान्नूल शहा बाबांच्या दर्ग्यात येऊन दर्शन घेतले.
नागोठण्यात सय्यद फान्नूल शहा बाबा यांचा उरूस गेल्या १५ वर्षांपासून येथील वरचा मोहल्ला भागातील शराफत कडवेकर (मामू) व त्यांच्या मित्र परिवाराकडून दरवर्षी साजरा करण्यात येत असतो. यावर्षीही या उरूसच्या निमित्ताने शुक्रवारी (दि.१४) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास शराफत कडवेकर यांच्या घरातून संदलची मिरवणूक काढण्यात आली. हे संदल पारंपरिक पद्धतीने नाशिक ढोलच्या सहाय्याने वाजत गाजत सय्यद फान्नूल शहा बाबा यांच्या दर्ग्याजवळ आणण्यात आले. त्यानंतर शराफत कडवेकर, नागोठणे मस्जिद मधील इमान साहेब जवाद मौलाना आदींसह उपस्थित सर्वांकडून सय्यद फान्नूल शहा बाबांच्या दर्ग्यावर चादर चढविण्यात आली. त्यानंतर  सर्व मुस्लिम बांधवांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्वांना लंगरचे (प्रसादाचे) वाटप करण्यात आले.
नागोठण्यातील सय्यद फान्नूल शहा बाबा यांचा हा उरूस उत्साहात साजरा करण्यासाठी शराफत कडवेकर, नागोठणे मस्जिद मधील इमान साहेब  जवाद मौलाना, अशपाक सुमारा, सुहेल पानसरे, मैनू पोत्रिक, शब्बीर पानसरे, सिराजभाई पानसरे, मंजर जुईकर, जोयेब कुरेशी, नागोठणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच अखलाक पानसरे, आदिल कडवेकर, हुजेफा मुजावर, काजीम पानसरे, आदिल पटेल, रईस अन्सारी आदींसह अनेक मुस्लिम बांधव व तरुण दर्ग्यात उपस्थित होते. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!