महाराष्ट्र ग्रामीण
नागोठण्यातील डॉ. नेल्सन मंडेला आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसोबत शिवजयंतीला स्नेहभोजन
राष्ट्रवादीचे विभागीय उपाध्यक्ष दिनेश घाग यांचा आगळावेगळा उपक्रम

नागोठण्यातील डॉ. नेल्सन मंडेला आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसोबत शिवजयंतीला स्नेहभोजन
राष्ट्रवादीचे विभागीय उपाध्यक्ष दिनेश घाग यांचा आगळावेगळा उपक्रम
महेश पवार
नागोठणे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्रच अनेक वैविध्यपूर्ण धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व इतर अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवून साजरी केली जात असते. मात्र नागोठण्यातील गवळ आळीतील रहिवासी असलेले तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय उपाध्यक्ष दिनेश यांनी येथील डॉ. नेल्सन मंडेला आश्रम शाळेतील छोट्या विद्यार्थ्यांसाठी शिवजयंतीच्या दिवशी स्वखर्चाने स्नेहभोजनाचा बेत आखून शिवजयंती आगळ्या वेगळ्या उपक्रमाने साजरी केली.

नागोठण्यातील डॉ. नेल्सन मंडेला आश्रम शाळेत १९ फेब्रुवारीला आगळ्या वेगळ्या स्वरूपात साजरी करण्यात आलेल्या या ३९५ व्या शिवजयंतीची सुरुवात श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व शिव प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यावेळी कुमार ऋषभ घाग याने अप्रतिम वेशभूषा करून बाल शिवाजीची भूमिका साकारली होती. नंतर बाल शिवाजी कुमार ऋषभ घाग शाळेतील छोट्या विद्यार्थ्यांसोबत मिसळून गेला होता. तदनंतर दिनेश घाग यांनी आश्रम शाळेत जिल्ह्यातील विविध भागातून शिक्षण घेण्यासाठी आलेले छोट्या विद्यार्थ्यांसोबत शैक्षणिक सुविधा, शैक्षणिक प्रगती व इतर अनेक बाबतीत संवाद साधला.

दिनेश घाग यांनी आश्रम शाळेत आयोजित केलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाच्या वेळी नागोठणे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सुनील लाड, सौ. कल्याणी दिनेश घाग, सौ. मयुरी प्रथमेश धाडसे, आश्रम शाळेतील शिक्षक नवनाथ डोंगरगावकर, कमाल सुभेदार, गंगासागर मराठे, सखाराम सांबरे, वनिता पाटील, ऋग्वेत घाग, किमया डुंबरे, श्रीराज पत्की, जय धाडसे आदींसह आश्रम शाळेतील ४० ते ५० विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. आई-वडिलांपासून खूप दूर राहून शिक्षण घेत असलेल्या आश्रम शाळेतील या छोट्या मुलांसाठी स्वतःच्या परिवाराला सोबत घेऊन स्नेह भोजनाची व्यवस्था करून समाजात एक वेगळा संदेश देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय उपाध्यक्ष दिनेश घाग यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.