
पाबळ विभाग प्रीमियर लीग २०२५ मध्ये वेद वाॅरियर्स विजेता
युवराज वाॅरियर्स पाबळ उपविजेता
दिनेश ठमके
सुकेळी : पेण तालुक्यातील पाबळ विभाग प्रीमियर लीग २०२५ या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन मैत्री ग्रुप यांच्या वतीने शनिवार दि. १५ व रविवार दि. १६ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये वेद वाॅरियर्स कार्ली – वरप संघ अंतिम विजेता ठरला. तर युवराज वॉरियर्स पाबळ संघ उपविजेता ठरला. या विजेत्या, उपविजेत्या तसेच तृतीय व चतुर्थ क्रमांक प्राप्त संघांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आकर्षक चषक व रोख पारितोषिक देउन गौरविण्यात आले.

सद्यस्थितीत रायगड जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी क्रिकेटच्या सामन्यांचे थरार सुरु असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पेण तालुक्यातील पाबळ विभाग प्रीमियर लीग २०२५ चे आयोजन मैत्री ग्रुप यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही अतिशय उत्साहात करण्यात आले होते. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात कार्ली – वरप येथील संघ मालक राकेश जाधव व ज्ञानेश्वर शिर्के यांच्या वेद वाॅरियर्स संघाने पाबळ येथील संघमालक गणेश गायकवाड यांच्या युवराज वॉरियर्सचा पराभव करून वेद वाॅरियर्स संघाने प्रथम क्रमांकाच्या चषकावर आपले नाव कोरले. विजेत्या संघाला रोख रक्कम रु. ५५, ५५५ व आकर्षक चषक तर उपविजेता ठरलेल्या युवराज वॉरियर्स या संघास रोख रक्कम रु. ४४,४४४ व चषक देऊन गौरविण्यात आले. तर कोंडवी येथील सागर कदम व जितु कदम यांच्या श्रीवा चॅम्पियन यांना तृतिय तर कुरनाड येथील आकेश दिवेकर यांच्या अर्विक चॅलेंजर्स यांना चतुर्थ क्रमांकावर समाधान मानावे लागले. या दोन्ही संघांना आकर्षक चषक देण्यात आले.
या स्पर्धेमध्ये मालिकावीर युवराज वॉरियर्सचा प्रणय दिवेकर, उत्कृष्ट फलंदाज ज्ञानेश्वर शिर्के, उत्कृष्ट गोलंदाज तेजस जंगम, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ओमकार धामणे, या सर्वांना विविध पारितोषिक देउन सन्मानित करण्यात आले. या संपुर्ण स्पर्धेचे यु ट्युब लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते.यावेळी युवराज वॉरियर्स संघाला प्रोत्साहित करण्यासाठी निवृत्ती दिवेकर, राजु रेशीम, हरेश रेशीम, जिग्नेश, सुशिल मराठा, रितेश गायकवाड, पांडुरंग भस्मा, दर्शन गायकवाड, उत्तम गायकवाड उपस्थित होते .ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मैत्री ग्रुपचे आयोजक ज्ञानेश्वर ( बंटी) जाधव, योगेश काडगे, हरेश आयरे, कल्पेश खोपरे, विशाल जाधव, विनायक खोपरे यांनी अपार मेहनत घेतली.