महाराष्ट्र ग्रामीणराजकारण
पळस ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुप्रिया डाकी यांची निवड
परीक्षा घासे नंतर शेतपळसला दुसऱ्यांदा संधी

पळस ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुप्रिया डाकी यांची निवड
परीक्षा घासे नंतर शेतपळसला दुसऱ्यांदा संधी
महेश पवार
नागोठणे : राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असलेल्या नागोठण्याजवळील पळस(ता. रोहा)
ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुप्रिया वामन डाकी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पळस ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच निष्ठा विचारे यांनी पक्षांतर्गत ठरलेल्या तडजोडीनुसार आपला कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण करून राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी पळस ग्रामपंचायतीच्या शेतपळस येथील सदस्या सुप्रिया वामन डाकी (सुप्रिया विलास माळी) यांची गुरुवारी (दि.२७) ग्रामपंचायतीच्या कार्यालयात संपन्न झालेल्या सदस्यांच्या मासिक बैठकीत ही निवड करण्यात आली. माजी सरपंच परिक्षा घासे–चंदने यांच्या नंतर विद्यमान बॉडीत शेतपळस गावाला सुप्रिया डाकी – माळी यांच्या रूपाने दुसऱ्यांदा सरपंचपद मिळाल्याने शेतपळस ग्रामस्थांमध्ये आनंदी वातावरण आहे.

सुप्रिया वामन डाकी यांची पळस ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवड जाहीर होताच राष्ट्रवादीच्या शेतपळस येथील कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करून व पेढे वाटून आपला आनंद व्यक्त केला.

यावेळी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय ज्येष्ठ नेते, रोहा पंचायत समितीचे माजी सभापती व पळस ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक शिवरामभाऊ शिंदे यांच्यासह पळस ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौ. निष्ठा योगेश विचारे, उपसरपंच चंद्रकांत भालेकर, सदस्य किसन बोरकर संतोष वाघमारे, सतीश डाकी, परीक्षा घासे, सुरेखा नाईक, उषा साळुंखे, ग्रामसेविका कांचन राऊत, भाजपाचे जेष्ठ नेते व पळस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मारूती शिर्के, माजी सरपंच हिराजी शिंदे, माजी सरपंच आनंद साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते अनिलशेठ डाकी, विक्रांत घासे, सचिन जोशी, सुभाष डाकी, रूपेश चदंने, पळस ग्रामपंचायतीचे कर्मचारी आदींसह अनेकांनी सुप्रिया डाकी यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पळस ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या पळस, शेतपळस, बाहेरशिव, वाघळी येथील ग्रामस्थ व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.