धार्मिक सोहळा
प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या नागोठण्यातील केंद्रात महाशिवरात्री उत्सव साजरा

प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या नागोठण्यातील केंद्रात महाशिवरात्री उत्सव साजरा
महेश पवार
नागोठणे : प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या नागोठणे येथील केंद्रात
मंगळवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी सकाळी विविध धार्मिक कार्यक्रमांनी महाशिवरात्री उत्सव एक दिवस आधी साजरा करण्यात आला. प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या नागोठणे केंद्रात महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने सकाळी सुरुवातीलाच

शिव ध्वजारोहण कार्यक्रम नागोठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. सुप्रियाताई संजय महाडिक यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यानंतर केंद्रात झालेल्या कार्यक्रमास नागोठणे केंद्राच्या प्रमुख राजयोगीनी मंदा दीदी व पुनम दीदी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागोठण्याच्या सरपंच सौ. सुप्रियाताई महाडिक, भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या वेलशेत येथील विद्या संकुलातील एस. डी. परमार स्कूलच्या प्राचार्या सौ. अमृता गायकवाड, नागोठणे ग्रामपंचायतीच्या सदस्य सौ. सुप्रिया संजय काकडे, गोपाळ खंडागळे, मिलिंद ताले तसेच नागोठणे ब्रह्माकुमारीज विद्यालयाचा संपूर्ण बी. के. परिवार उपस्थित होता.

सर्व उपस्थितांना आदरणीय पुनम दीदींनी महाशिवरात्रीचे अध्यात्मिक महत्त्व तसेच शिव आणि शंकर यातील फरक आणि राजयोगाचे जीवनातील महत्व समर्पक शब्दांत सांगितले. अशाप्रकारे उपस्थित सर्वांना महाशिवरात्री निमित्ताने धार्मिक माहिती देण्यात आली व सर्वांना महाप्रसाद देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.