आरोग्यमहाराष्ट्र ग्रामीण
सॅटॅलाइट रोटरी इंटरनॅशनल क्लब नागोठणे व रोहा यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवारी नागोठण्यात आरोग्य तपासणी शिबिर
सचिन मोदी यांचे विशेष सहकार्य

सॅटॅलाइट रोटरी इंटरनॅशनल क्लब नागोठणे व रोहा यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवारी नागोठण्यात आरोग्य तपासणी शिबिर
उपचार व औषधांचे होणार मोफत वाटप
सचिन मोदी यांचे विशेष सहकार्य
महेश पवार
नागोठणे : सॅटॅलाइट रोटरी इंटरनॅशनल क्लब, नागोठणे व रोटरी क्लब रोहा आणि डॉ आर. एन. पाटील यांचे सुरज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २ मार्च २०२५ रोजी नागोठणे बाजारपेठ नजिक असलेल्या शिव गणेश उत्सव मंडळ सभागृहात करण्यात आल्याची माहिती नागोठणे रोटरी क्लबचे अध्यक्ष सचिन मोदी यांनी दिली. या शिबिरात आरोग्य तपासणी, उपचार व मोफत औषधे वाटप करण्यात येणार आहे.
या शिबिरात मेंदूचे आजार, मणक्याचे आजार, मानसिक विकार, हृदय विकार , रक्ताच्या विविध चाचण्या तसेच छातीचा एक्सरे, इसीजी, ब्लड शुगर तपासणी, ऑडीमेट्रि टेस्ट (ज्यांना कमी ऐकू येतो) या तपासण्या होणार आहेत व त्यावर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला देण्यात येणार आहे. हे शिबिर येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत भरविण्यात आले आहे. या शिबिरात डॉ. आर. एन. पाटील, डॉ उदय पाटील, डॉ रमा पाटील, डॉ अंजली पाटील या तज्ञ डॉक्टरांकडून शिबिरात येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे.
या शिबिरात सहभागी होण्यासाठी डॉ. रोहिदास शेळके (मो. ९९७००५०९६६)सचिन मोदी (मो.९८२२०४०४८५) गौतम जैन (मो. ९८२२०४०४८६) यांच्याशी संपर्क करण्यास सांगण्यात आले आहे. या शिबिरासाठी सचिन मोदी यांचे विशेष सहकार्य लाभले असून या शिबिराच्या लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असे आव्हान रोटरी क्लब नागोठणे तर्फे करण्यात आले आहे. सदर आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी खासदार धैर्यशीलदादा पाटील, आमदार रवीशेठ पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठदादा पाटील तसेच अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.