श्री क्षेत्र विठ्ठलनगर येथील स्वयंभू विठ्ठल रखुमाई मंदिराचा १४ वा वर्धापन दिन सोहळा व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण

श्री क्षेत्र विठ्ठलनगर येथील स्वयंभू विठ्ठल रखुमाई मंदिराचा १४ वा वर्धापन दिन सोहळा व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण
भाविकांना लाभणार झी टॉकीज फेम गुरुवर्य ह.भ.प. वैभव महाराज गाढवे यांच्या कीर्तनाची पर्वणी
अनिल पवार
नागोठणे : श्री क्षेत्र विठ्ठल नगर (विठ्ठलवाडी) ता. माणगाव येथील श्री स्वयंभू विठ्ठल रखुमाई मंदिराचा चौदावा वर्धापन दिन सोहळा व त्याच निमित्ताने ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या ९ व्या व १२ व्या अध्यायाचे पारायण यांसह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन श्री क्षेत्र विठ्ठलनगर ग्रामस्थांच्या सहकार्याने तसेच गुरुवर्य ह.भ.प. गणेश महाराज नलावडे (आंबेवाडी) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री स्वयंभू विठ्ठल रखुमाई मंदिरात शुक्रवार दि.२८ फेब्रुवारी ते रविवार दि. २ मार्च या कालावधीत करण्यात आले आहे.
श्री क्षेत्र विठ्ठलनगर येथील श्री स्वयंभू विठ्ठल रखुमाई मंदिराच्या १४ व्या वर्धापन दिन सोहळ्याची सुरुवात शुक्रवार दि. २८ रोजी सायंकाळी ४ वा. ग्रामस्थ मंडळ विठ्ठलनगर यांच्या भजनाने होईल. याचदिवशी रात्री ९ ते ११ वाजे पर्यंत गुरुवर्य ह.भ.प. विजया महाराज तेलंगे (तळवली) यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे. यानंतर रातुआई प्रासादिक भजन मंडळ रातवड यांचा हरिजागर कार्यक्रम होणार आहे. शनिवारी (दि.०१मार्च) सकाळी ७ वा. पुरोहित गिरीष श्रोत्री यांच्या उपस्थितीत विठ्ठलनगर येथील सागर सदानंद शिंदे दांपत्य यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक संपन्न होणार आहे.सकाळी ९ ते ११ या वेळेत श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. यानंतर सकाळी ११ ते १ वा . पर्यत या वेळेत गुरुवर्य ह.भ.प गणेश महाराज नलावडे ह.भ.प. नारायण महाराज लाड व ह.भ.प. सुनील महाराज जऊर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या नवव्या व बाराव्या अध्यायाचे सामुदायिक पारायण करण्यात येणार आहे. सायं. ४ ते ६ वा. प्रासादिक भजन मंडळ श्री ज्ञानेश्वर सत्संग यांचे भजन होणार आहे.तर सायं. ५ ते ६ वा. ह.भ.प. नारायण महाराज लाड यांचे प्रवचन होणार असून कोलाड विभाग वारकरी सांप्रदायाचे सायं. ६ ते. ७ वाजेपर्यंत हरिपाठ होणार आहे.
याचबरोबर शनिवारी (दि.०१) रात्री ९ ते ११ वा. यावेळेत मराठी वाहिनी झी टॉकीज वरील ‘मन मंदिरा गजर किर्तनाचा’ या कार्यक्रमातील प्रसिद्ध किर्तनकार गुरुवर्य ह.भ.प.वैभव महाराज गाढवे(राजगुरुनगर, पुणे) यांचे सुश्राव्य असे किर्तन होणार असल्याने माऊली भक्तांना एक वेगळीच पर्वणी असणार आहे. यानंतर ग्रामस्थ मंडळ विठ्ठलनगर यांचा सामुहिक हरिजागर असणार आहे.
रविवारी (२मार्च) सकाळी ५ ते ७ वा. पर्यत या वेळेस काकड आरती, सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत गुरुवर्य ह.भ.प. गणेश महाराज नलावडे यांचे काल्याचे किर्तन होणार असून सायं. ०३ ते ०६ वाजेपर्यत या वेळेत श्रींची भव्य पालखी मिरवणूक निघणार आहे. दरम्यान रविवारी (दि.०२) ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ व महिला बचत गट विठ्ठलनगर (विठ्ठलवाडी) यांच्यावतीने सर्व भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री क्षेत्र विठ्ठल नगर येथील श्री स्वयंभू विठ्ठल रखुमाई मंदिराचा १४ वा वर्धापन दिन सोहळा व त्यानिमित्ताने आयोजित सर्व धार्मिक कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ व महिला बचत गट विठ्ठलनगर हे अथक परिश्रम घेत आहेत.