महाराष्ट्र ग्रामीण
सिमरन मोटर्सच्या नागोठण्यातील शोरूमचे शानदार उद्घाटन
नागोठणे शहर व परिसरातील मारुतीच्या कार मालिकांसाठी सुविधा

सिमरन मोटर्सच्या नागोठण्यातील शोरूमचे शानदार उद्घाटन
नागोठणे शहर व परिसरातील मारुतीच्या कार मालिकांसाठी सुविधा
महेश पवार
नागोठणे : मारुती सुझुकी या चार चाकी वाहनांचे रायगड जिल्ह्यातील अधिकृत डीलर असलेल्या व नावाजलेल्या अशा सिमरन मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या चिकणी (नागोठणे) येथील मारुती सुझुकी अरेना, एन.एच.६६ या नवीन शोरूमसह बॉडी वर्कशॉप, सर्व्हिस सेंटर यांचे शानदार उद्घाटन शुक्रवारी(दि.२१) सायंकाळी नागोठणे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी, पाटणसई ग्रामपंचायतीच्या सरपंच माधवी गायकर तसेच नागोठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रियाताई महाडिक यांच्या हस्ते संपन्न झाले.

नागोठणे शहर व नागोठणे परिसरातील आजूबाजूच्या गावात मारुती सुझुकीच्या चार चाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या सर्व वाहन मालकांना आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करायची झाल्यास अलिबाग, वडखळ, पनवेल या ठिकाणी दूरवर जावे लागत होते. त्यामुळे त्यांचा संपूर्ण दिवस वाया जात होता. नागोठणे शहर व आजूबाजूच्या परिसरात मारुती सुझुकी कंपनीच्या चार चाकी वाहनांची वाढलेली संख्या पाहता मारुती सुझुकी कंपनीचे जिल्ह्यातील सन २००८ पासून अधिकृत डीलर असलेल्या व वाहन मालकांना सर्वोत्तम सेवा देणाऱ्या सिमरन मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडने आपल्या ग्राहकांसाठी नागोठणे येथे हे भव्य शोरूम सुरू करून मारुती सुझुकी कारच्या ग्राहकांच्या वाहनांसाठी नवीन कारची खरेदी व सर्व्हिसिंगची सोय उपलब्ध करून दिली आहे. भविष्यात या सर्व्हिस सेंटर मधून वाहनांच्या सर्व्हिसिंगसाठी कारची पिकअप व ड्रॉप फॅसिलिटी सुरू करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

नागोठण्याजवळील चिकणी येथील महामार्गालगतच सुरू करण्यात आलेल्या सिमरन मोटर्सच्या या भव्य शोरूमच्या उद्घाटन प्रसंगी सिमरन मोटर्सचे संचालक तरण कोहली, सनी चड्डा, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मारुती देवरे, नागोठणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच अकलाख पानसरे, माजी उपसरपंच मोहन नागोठणेकर, पाटणसई ग्रामपंचायतीचे सदस्य सचिन कळसकर, जवरुद्दीन सय्यद, नागोठणे ग्रामपंचायतीचे सदस्य संतोष नागोठणेकर, अमृता महाडिक, पोलिस हे. कॉ. विनोद पाटील, पोलीस वाहन चालक मिलिंद महाडिक, पप्पूशेठ अधिकारी, यशवंत झोरे, रुपेश नागोठणेकर, चौधरी शेठ, सिमरन मोटर्सचे सेल्स मॅनेजर महेश नागोठणेकर, ब्रँच हेड संदेश म्हात्रे, बॉडी शॉप वर्क्स मॅनेजर इमरान पटेल, महिंद्रा फायनान्स व चोळामंडळ फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच सिमरन मोटर्सच्या चिकणी – नागोठणे शोरूम मधील कर्मचारी वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागोठणे ग्रामपंचायतीचे कर्मचारी प्रमोद चोगले यांनी केले.