महाराष्ट्र ग्रामीण
आमडोशी येथील गजानन जांबेकर यांच्या जुन्या घराला भीषण आग
आग लागण्याचे कारण गुलदस्त्यात

आमडोशी येथील गजानन जांबेकर यांच्या जुन्या घराला भीषण आग
आग लागण्याचे कारण गुलदस्त्यात
दिनेश ठमके
सुकेळी : नागोठण्याजवळील आमडोशी गावातील गजानन परशुराम जांबेकर यांच्या नव्याने बांधण्यात आलेल्या घराला शनिवार दि.१५ मार्च २०२५ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास भयानक आग लागल्यामुळे संपूर्ण खोली जळुन खाक झाली. या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र ही आग लागण्यामागील कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.

याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार आमडोशी गावावातील गजानन परशुराम जांबेकर यांचा जुना वाडा पंरतु संध्या नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या घराला रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्यामुळे सर्वत्र अग्नितांडवचे चित्र पहावयास मिळले. या जळालेल्या घरामध्ये सुकी लाकडे असल्याने आग ही मोठ्या प्रमाणात वाढत गेली. तात्काळ जवळच असलेल्या सुप्रीम कंपनी आमडोशी येथिल तसेच जिंदल कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज येथिल फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या पंरतु गाड्या अपघातस्थळी जाण्यासाठी मार्ग नसल्याने अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी फायर इंन्स्रिकेशन करण्यात आले. यावेळी आमडोशी येथिल अग्निशामक दल, सुकेळी येथिल जिंदल कंपनी, रिलायन्स कंपनी येथिल अग्निशामक दलाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी जवळपास २. ३० वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आणली. याबाबतीत पुढील तपास नागोठणे पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी करीत आहेत.