डॉ. सुनील पाटील यांना रायगड कोकण रत्न पुरस्कार
डॉ. सुनील पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन

फोटो : डॉ.सुनील पाटील यांचे अभिनंदन करताना कराटेपटू मास्टर कल्पेश शिंदे
डॉ. सुनील पाटील यांना रायगड कोकण रत्न पुरस्कार
डॉ. सुनील पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन
महेश पवार
नागोठणे : नागोठण्यातील मायालक्ष्मी मॅटर्निटी व नर्सिंग होमचे संचालक डॉ. सुनील पाटील यांना “रायगड कोकण रत्न पुरस्कार २०२५” या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. नागोठण्यातील टी. एस. के .मंगल कार्यालय सभागृहात रविवार दिनांक २ मार्च रोजी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्काराबद्दल डॉ. सुनील पाटील यांचे त्यांच्या मित्र परिवारासह सर्वत्र अभिनंदन होत आहे.
यावेळी कला क्रीडा शैक्षणिक अध्यात्मिक वैद्यकीय सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी केलेल्या रायगड जिल्ह्यातील व्यक्तींचा गुणगौरव सोहळा बिर्ला कंपनीचे उपाध्यक्ष अरुण शिर्के व पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मंगेश नेने यांच्या हस्ते पार पडला. यामध्येच डॉ. सुनील पाटील यांचा उत्कृष्ठ वैद्यकीय सेवेसाठी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. रायगड कोकण रत्न पुरस्कार समितीचे अध्यक्ष तथा रोहा पत्रकार मित्र संघाचे अध्यक्ष सचिन साळुंखे आणि कोकण रत्न पुरस्कार समितीचे उपाध्यक्ष व नागोठण्याजवळील कडसुरे येथील प्रसिद्ध कराटेपटू कल्पेश शिंदे यांच्याकडून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.