जनतेचे आशीर्वाद व ईश्वराची साथ असल्यानेच माझे संकल्प पूर्ण : किशोरभाई जैन
किशोरभाई जैन यांचा ६० वा वाढदिवस उत्साहात साजरा

जनतेचे आशीर्वाद व ईश्वराची साथ असल्यानेच माझे संकल्प पूर्ण : किशोरभाई जैन
किशोरभाई जैन यांचा ६० वा वाढदिवस उत्साहात साजरा

किशोरभाई जैन यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त भाएसोच्या शैक्षणिक संकुलातील श्रीमती शांतीबाई ओ. जैन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिर व किशोरभाई जैन यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायाला संबोधित करताना किशोरभाई जैन बोलत होते. तत्पूर्वी किशोरभाई जैन यांनी त्यांच्या पत्नी व संस्थेच्या उपाध्यक्ष सौ. संगीता किशोर जैन, मुलगा व भाएसोचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक जैन, स्नुषा सौ. प्रियांका कार्तिक जैन, नातू कु. शार्विल कार्तिक जैन कुटुंबीयांसोबत केक कापून आपला ६० वा वाढदिवस साजरा केला.


बी. ए. एम. एस. पदवी प्राप्त डॉक्टरला क्लास वन अधिकाऱ्याचा दर्जा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डॉक्टर होता यावे, आपल्या परिसरातील व ग्रामीण भागातील नागरिकांना आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा लाभ व्हावा या हेतूने मी हे आयुर्वेदिक कॉलेज सुरू केले. आयुर्वेदिक उपचार पद्धतीत रुग्णाला उशिरा फरक पडत असला तरी याचा परिणाम १०० टक्के आहे. परदेशातील व्यक्तीलाही आयुर्वेदिक उपचार पद्धतीसाठी विसा प्राप्त होत असतो. मी स्वतः आयुर्वेदिक उपचार पद्धती स्वीकारली असल्याने आपल्या भागातील लोकांनी या सेवेचा तात्काळ लाभ घेण्यास सुरुवात करावी. जगभरातील आयुर्वेदिक कॉलेजच्या यादीत नागोठण्यातील या आयुर्वेदिक कॉलेजचे नाव आज समाविष्ट झाले आहे. देशभरातील शंभर विद्यार्थ्यांचा प्रवेश या कॉलेजमध्ये झाला आहे. मात्र आपल्या या आयुर्वेदिक कॉलेजमध्ये आपल्या भागातील फक्त दोनच विद्यार्थी प्रवेश पात्र होऊ शकले याची खंत आहे. त्यामुळे मेडिकल कॉलेजच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेचा अभ्यास आपल्या भागातील विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने करून या मेडिकल कॉलेजचा लाभ घ्यावा.
– किशोरभाई जैन, संस्थापक अध्यक्ष, भाएसो, वेलशेत – नागोठणे