मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून अलिबाग येथे पार पडले पोपटी काव्य संमेलन

मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून अलिबाग येथे पार पडले पोपटी काव्य संमेलन
महेश पवार
नागोठणे : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून साहित्य संपदा तर्फे अलिबाग मध्ये नुकतेच पोपटी काव्य संमेलन पार पडले. पोपटी काव्य संमेलनात साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘जगलेल्या कविता’ -प्रयोग क्रमांक १५ पार पडला.
सदर संमेलनात रायगड, मुंबई,पुणे येथील विविध कवींनी सहभाग नोंदविला. रायगड भूषणप्राप्त कवी रमेश धनावडे यांनी संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविले. स्मिता हर्डीकर यांनी आपल्या गझला सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळवली.अलिबाग मधील कवी दिलीप मोकल, नवी मुंबई येथील ‘तीळ’ फेम कवी लालसिंग वैराट, पुण्याहून उपस्थित राहिलेल्या कवयित्री अर्चना गोरे, प्रांजली मोहिते यांनी आपल्या कविता सदर संमेलनात सादर केल्या.
‘कवितेचे घर ‘संकल्पनाकार श्रीकांत पेटकर यांनी आपल्या कवितां सोबत मराठीतील नामवंत कवींच्या कविता सादर करून वैभवशाली मराठी साहित्य परंपरा उलगडून दाखवली. तेजस्विनी फाउंडेशन अध्यक्षा ऍड.जीविता पाटील यांनी आपल्यातील कवयित्रीचे दर्शन घडवत स्वलिखित कविता सादर केल्या,कार्यक्रमास उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था अध्यक्षा उज्वला चंदनशिव यांनी विशेष उपस्थिती दर्शवली.नॉम नॉम रेस्टॉरंटचे संजय पाटील यांनी सुद्धा आपल्या सुमधुर आवाजात काही गाणी सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. साहित्य संपदातर्फे नुकतेच प्रकाशित झालेल्या, प्रांजली मोहिते यांच्या ‘मिलाफ’ या चित्रकाव्य संग्रहातील काही निवडक कवितांचे वाचन पार पडले. अर्चना गोरे यांच्या ‘वनमाला’ काव्यसंग्रहात राजश्री पाटील यांनी केले.प्रेक्षक म्हणून अमित हर्डीकर आणि पूनम धनावडे यांनी मत नोंदविताना असे कार्यक्रम रायगड मधील साहित्यिक चळवळींना प्रेरणा देतील आणि मराठी भाषा संर्वधनास हातभार लावतील असे मत नोंदविले.रमेश धनावडे आणि दिलीप मोकल यांच्या साहित्यसंपदा प्रकाशनातर्फे येणाऱ्या आगामी काव्यसंग्रहास शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.योगेश टोपले याचे विशेष सहकार्य पोपटीस लाभले.