आरोग्यमहाराष्ट्र ग्रामीण
नागोठण्यातील सॅटलाईट रोटरी क्लबचे काम कौतुकास्पद : वैकुंठदादा पाटील
आरोग्य शिबिराचा २५० नागरिकांनी घेतला लाभ

नागोठण्यातील सॅटलाईट रोटरी क्लबचे काम कौतुकास्पद : वैकुंठदादा पाटील
सचिन मोदी नागोठण्यातील कोहिनूरचा हिरा असल्याचे केले कौतुक
आरोग्य शिबिराचा २५० नागरिकांनी घेतला लाभ
महेश पवार
नागोठणे : “रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा” असून सचिन मोदी यांच्या विशेष सहकार्याने आयोजित केलेले हे आरोग्य तपासणी शिबिर त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे नागोठणे रोटरी क्लबचे काम कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठदादा पाटील यांनी काढले. तसेच सचिन मोदी हा नागोठण्यातील कोहिनूरचा हिरा असून त्याच्या प्रकाश झोतात नागोठण्यात असे अनेक समाजोपयोगी कार्यक्रम होतच राहतील असा आशावादही वैकुंठदादा पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
नागोठणे सॅटॅलाइट रोटरी इंटरनॅशनल क्लब, रोहा रोटरी क्लब व डॉ. आर.एन.पाटील यांचे सुरज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने व सचिन मोदी यांच्या विशेष सहकार्याने शिव गणेशोत्सव मंडळ सभागृहात रविवार दिनांक २ मार्च रोजी आयोजित
आरोग्य तपासणी, उपचार व मोफत औषधे वाटप शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी वैकुंठदादा पाटील बोलत होते.

भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठदादा पाटील, नागोठण्याच्या सरपंच सुप्रिया संजय महाडिक, सहा.पो.नि.सचिन कुलकर्णी, सुरज हॉस्पिटलचे डॉ. उदय पाटील,भाजप रा.जि.कार्यकारणी सदस्य मारुती देवरे, रोटेरियन सचिन मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठदादा पाटील, नागोठण्याच्या सरपंच सुप्रिया संजय महाडिक, सहा.पो.नि.सचिन कुलकर्णी, सुरज हॉस्पिटलचे डॉ. उदय पाटील,भाजप रा.जि.कार्यकारणी सदस्य मारुती देवरे, रोटेरियन सचिन मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नागोठणे सरपंच सुप्रियाताई महाडिक, भाजपा जि.उपाध्यक्षा श्रेया कुंटे,भाजपा ता.सरचिटणीस आनंद लाड, गडब सरपंच मंगेश पाटील, प्रियदर्शनी संस्थेचे अध्यक्ष सिराज पानसरे, ग्रा.पं. सदस्या अमृता महाडिक, विणा मोदी, नागोठणे रोटरी क्लबचे डॉ. सुनील पाटील, डॉ.रोहिदास शेळके, गौतम जैन, डॉक्टर अभिषेक शहासने, प्रशांत गोळे, निलेश सोलंकी, धीरज मोदी, मांगीलाल चौधरी, विनोद पवार, प्रमोद नागोठणेकर आदींसह रुग्ण व नागरिक उपस्थित होते. सदर शिबिराला रोहा रोटरी क्लबचे राजू पोकळे, विक्रम जैन, सुरेंद्र निंबाळकर यांनी भेट दिली. या शिबिरात २५० नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली.

सचिन मोदी यांचे विशेष सहकार्य लाभलेल्या या शिबिरात वैकुंठदादा पाटील पुढे म्हणाले की, आज विविध प्रकारचे आजार वाढत असून त्यामधून व्यायामपटूही सुटत नाहीत. त्यामुळे आपली दैनिक तपासणी करणे महत्वाचे असून त्यासाठी आशा शिबिरांची आवश्यकता नक्कीच आहे. असे शिबीर सचिन मोदी यांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून राबवून महत्वाचे काम केले आहे. आपल्या आरोग्यासाठी शिबीर व सरकारी योजनेचा फायदा घेण्याचे आवाहन करून नागोठणे येथे भव्य रुग्णालयाची आवश्यकता तसेच येथील सरकारी रुग्णालयाची सुधारणा करणे गरजेचे असल्याचे शेवटी पाटील यांनी सांगितले. डॉ.सुनील पाटील यांनी आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेतली पाहिजे. डोके शांत ठेऊन आरोग्य सांभाळण्याचा सल्ला त्यांनी दिला. डॉ.उदय पाटील यांनी कोणीही वंचित न राहता आरोग्यासाठी सरकारी योजनेचा लाभ घ्या. आरोग्याबाबत आम्ही लोकांपर्यंत शिबिरा मार्फत पोहचत असतो आम्हाला सेवेची संधी द्या असे सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी या धकाधकीच्या जीवनात आरोग्य सांभाळा, आरोग्याची काळजी घेत वेळीच उपचार करावा. शरीरासाठी व्यायाम व सकस आहार हा उत्तम उपाय आहे. सचिन मोदी यांना यासारखे शिबीर भरवून समाज सेवा करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सचिन मोदी यांनी प्रास्ताविक करताना अशा शिबिराची आपल्या नागोठणे विभागात व रोहा तालुक्यात नितांत गरज असल्याचे सांगून अशा प्रकारचे शिबीर सतत भरविणार असल्याचे स्पष्ट करून रुग्णांची सेवा करणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता क्लबचे पदाधिकारी, सदस्यांनी तसेच रुग्णालयाचे डॉक्टर व कर्मचारी यांनी अपार मेहनत घेतली. सुरज रुग्णालयचे विनोद म्हात्रे व त्यांची संपूर्ण टीमच सहकार्य या शिबिराला लाभले. तसेच ट्रू डायग्नोसिसचे परेश पाटील व नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र यांनीही रक्त चाचणीसाठी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद नागोठणेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन मोदी यांनी केले.