मनोरंजनमहाराष्ट्र ग्रामीण
सुकेळी येथे शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

सुकेळी येथे शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा
दिनेश ठमके
सुकेळी : नागोठण्याजवळील सुकेळी (ता. रोहा) या ठिकाणी सोमवार ( दि.१७) रोजी तीथिनुसार
शिवजयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ९ वाजता किल्ले अवचितगड येथुन सुकेळी या ठिकाणी शिवज्योतीचे आगमन झाल्यानंतर शिवज्योतीच्या पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर शिवप्रतिमेचे पुजन झाल्यानंतर ११ वाजता श्री. विजया भवानी मंदिर सुकेळी येथे सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले होते.
दुपारी ३ ते ६ या वेळेत शिवप्रतिमेची मिरवणूक व पालखी सोहळा पार पडला. यावेळी जय भवानी जय शिवाजी , छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी संपुर्ण परिसर दणाणून गेला होता. अनेकांनी पारंपारिक वेशभूषा साकारत पालखी सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग दर्शवला होता सायंकाळी ऐनघर, आमडोशी पंचक्रोशीचा हरिपाठ झाल्यानंतर गावदेवी मित्र मंडळ सुकेळी यांच्याकडून उपस्थित शिवभक्तांना स्नेहभोजन देण्यात आले. शेवटी रात्री आळंदी देवाची येथील शिवकन्या कु. देवयानीताई मोरे यांच्या सुश्राव्य किर्तनानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी हरिपाठ व किर्तन नेतृत्व ऐनघर,आमडोशी पंचक्रोशी वारकरी सांप्रदायाचे अध्यक्ष ह. भ. प.नानाजी महाराज शिरसे यांनी केले. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ व महिला मंडळ, गावदेवी मित्र मंडळ तसेच नव युवती मित्र मंडळ सुकेळी यांनी मेहनत घेतली.