सुकेळी येथे सोमवारी सुप्रसिद्ध किर्तनकार कु. देवयानी ताई मोरे यांची किर्तनसेवा

सुकेळी येथे सोमवारी सुप्रसिद्ध किर्तनकार कु. देवयानी ताई मोरे यांची किर्तनसेवा
दिनेश ठमके
सुकेळी : नागोठणे जवळच असलेल्या ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ तसेच गावदेवी मित्र मंडळ सुकेळी यांच्या वतीने तीथीनुसार सोमवार दि.१७ मार्च २०२५ रोजी हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सालाबादप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. यावेळी विविध कार्यक्रमांसोबतच आळंदी देवाची येथील शिवकन्या देवयानी ताई मोरे यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांमध्ये रविवार( दि. १६ ) रोजी रात्री १० ते १२ या वेळेत सर्व ग्रामस्थांना छावा हा चित्रपट पडद्यावर दाखविण्यात येणार आहे. सोमवार ( दि. १७) रोजी सकाळी ९ वाजता किल्ले अवचितगड येथुन सुकेळी येथे शिवज्योतीचे आगमन होईल. त्यानंतर ११ ते २ या वेळेत विजया भवानी मंदिर सुकेळी येथे सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ ते ६ या वेळेत शिवप्रतिमेची मिरवणूक व पालखी सोहळा पार पडल्यानंतर ऐनघर, आमडोशी पंचक्रोशी यांचे हरिपाठ होईल. त्यानंतर गावदेवी मित्र मंडळ सुकेळी यांस कडुन उपस्थित शिवभक्तांना स्नेहभोजन दिल्यानंतर श्री. संत बहिणाबाई वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची येथिल प्रख्यात किर्तनकार कु. देवयानी ताई मोरे यांच्या किर्तनाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ व महिला मंडळ, गावदेवी मित्र मंडळ व नव युवती मंडळ सुकेळी हे सर्वच अपार मेहनत घेत आहेत.