आरोग्यमहाराष्ट्र ग्रामीण
सुनील कुथे यांचे अध्यक्ष म्हणून कार्य कौतुकास्पद : ॲड. धनंजय धारप
नागोठणे लायन्स क्लबच्या शिबिरात ४६ रुग्णांची तपासणी

सुनील कुथे यांचे अध्यक्ष म्हणून कार्य कौतुकास्पद : ॲड. धनंजय धारप
नागोठणे लायन्स क्लबच्या मोतीबिंदू शिबिरात ४६ रुग्णांची तपासणी
११ मोतीबिंदू रुग्णांवर शस्त्रक्रिया
महेश पवार
नागोठणे : नागोठणे लायन्स क्लब शहर व परिसरात विविध बाबतीत समाजोपयोगी कार्यक्रम राबवित आहेत. अशाप्रकारे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागोठणे लायन्स क्लबच्या मोफत नेत्र चिकित्सा कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मला दिल्याबद्दल मी नागोठणे लायन्स क्लबचा सदैव ऋणी राहणार आहे. समाजात वावरत असताना आपण कमवितो त्यामधील एक हिस्सा समाज कार्यासाठी देणे आवश्यक असून सुनील कुथे यांनी आपले आई वडील हयात असताना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे. नागोठणे लायन्स क्लबचे अध्यक्ष म्हणून त्यांचे हे कार्य नक्कीच कौतुकास्पद असल्याचे गौरोद्गार रोहा व पाली न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ व रोहा अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष आणि पाली येथील श्री बल्लाळेश्वर देवस्थानचे माजी सरपंच ॲड. धनंजय धारप यांनी नागोठण्यात बुधवारी(दि.५) संपन्न झालेल्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात काढले.

निवृत्त पोलीस अधिकारी बबन कुथे व सौ. सावित्री बबन कुथे यांच्या वतीने ला.सुनील कुथे यांच्या सौजन्याने आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पीटल नवीन पनवेल यांच्या सहकार्याने नागोठणे लायन्स क्लबने येथील शांतीनगर भागातील स्व. बाळासाहेब ठाकरे बाल उद्यानात आयोजित केलेल्या या शिबिरास ॲड. धनंजय धारप यांच्यासह नागोठण्याच्या सरपंच सुप्रिया महाडिक, ॲड. महेश घायले, ॲड. दिनेश वर्मा, ॲड. महेश पवार, लायन्स क्लब अध्यक्ष लायन सुनील कुथे, लायन ॲड. स्मिता कुथे, चार्टड प्रेसिडेंट लायन प्रकाश जैन, झोनल चेअरमन एमजेएफ लायन विवेक सुभेकर, लायन्स क्लब उपाध्यक्ष लायन विशाल शिंदे, सेक्रेटरी लायन डॉ.अनिल गिते, लायन दौलत मोदी, लायन जयराम पवार, लायन सखाराम ताडकर, लायन सिद्धेश काळे, लायन विद्या म्हात्रे, आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पीटलचे ऍडमिन विजय बामणे, गीतांजली सवादकर आदींसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या शिबिरात ४६ नागरिकांनी त्यांच्या डोळ्यांची तपासणी केली. यामध्ये मोतिबिंदू आढळलेल्या ११ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पनवेल येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती एमजेएफ लायन विवेक सुभेकर यांनी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन एमजेएफ लायन विवेक सुभेकर यांनी तर प्रास्ताविक लायन ॲड. स्मिता कुथे यांनी केले. तर लायन डॉ.अनिल गीते यांनी मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाल्यानंतर कोणती काळजी घ्याची यासंबंधी अतिशय महत्वपूर्ण माहिती उपस्थित नागरिकांना दिली.