वांगणी हायस्कूलच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर उत्साहात संपन्न

वांगणी हायस्कूलच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर उत्साहात संपन्न
दिनेश ठमके
सुकेळी : सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या नागोठण्याजवळील वांगणी (स्थळ – बाळसई) हायस्कूल मधील सन २०००- २००१ च्या इयत्ता दहावीच्या बॅच मधील माजी विद्यार्थ्यांनी तब्बल २५ वर्षांनी एकत्रित येत गेट टुगेदर आयोजित केला होता. हा भावनिक व उत्साहपूर्ण सोहोळा पाली जवळील भार्जे येथे सुप्रसिद्ध व्यावसायिक राहुल पवार यांच्या मालकीच्या “अण्णा फार्म” या ठिकाणी संपन्न झाला.
यावेळी सर्व माजी विद्यार्थी – विद्यार्थ्यांनीनी आपले व्यक्तिगत मनोगत व्यक्त करीत शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. २५ वर्षांनंतर पुन्हा भेट झाल्यामुळे सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. जुन्या आठवणींना उजाळा देत गेट टुगेदरच्या निमित्ताने प्रत्येकाने आपला परिचय दिला. तसेच शाळेय जीवनातील गंमतीशीर व संस्मरणीय क्षण शेअर केले. शाळेबद्दल असलेला स्नेह आणि आपुलकी शेवटपर्यंत टिकेल अशी सर्वांनी ग्वाही दिली.
तसेच यावेळी विविध प्रकारचे गेम देखिल खेळण्यात आले. यामध्ये संगित खुर्ची, संगिता सर्कल, बुद्धिमत्ता चाचणी या खेळांचा मनमुराद आनंद लुटला. त्यानंतर दुपारी शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वांनी जेवणाचा मनमुराद आस्वाद घेतला. शेवटी या स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांना बक्षिसे देऊन या गेट टुगेदरची सांगता करण्यात आली. या गेट टुगेदर साठी जितेंद्र शिनगारे, मनोज तेलंगे, मधुकर करंजे, विश्वनाथ शिर्के, किरण शिंदे, विलास राणे, जितेंद्र जांबेकर, विश्वजीत जांबेकर, हेमंत तेलंगे, सुभाष म्हसकर, निलेश जाधव, संदिप पाटेकर, आशा जाधव, स्मिता रेवाळे, दिपाली जांबेकर, निलिमा जांबेकर, प्रभा ठाकुर, उर्मिला जांबेकर, चंचला भोसले, राजश्री जाधव आदी विद्यार्थी उपस्थित होते.