महाराष्ट्र ग्रामीणविवाह सोहळा
वसंत तेरडे व सौ. वर्षा वसंत तेरडे यांच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस उत्साहात साजरा

वसंत तेरडे व सौ. वर्षा वसंत तेरडे यांच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस उत्साहात साजरा
महेश पवार
नागोठणे : नागोठणे व बेणसे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व काळण समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक वसंत (नाना) आप्पा तेरडे व सौ. वर्षा वसंत तेरडे यांच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस नुकताच मोठ्या उत्साहात तसेच तेरडे यांचे नातेवाईक, आप्तेष्ट, सगेसोयरे तसेच मोठ्या संख्येने असलेल्या त्यांच्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
वसंत (नाना) आप्पा तेरडे व सौ. वर्षा वसंत तेरडे यांच्या लग्नाचा ५० व्या लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नरेंद्रशेठ जैन व दिलीपभाई टके मित्रमंडळ नागोठणे यांच्या वतीने नरेंद्रशेठ जैन, दिलीपभाई टके, प्रकाशशेठ जैन, सुधाकर जवके, अशोकशेठ पटेल, दिलीप शहासने, रमेश पिताणी, गुणवंत वाघेला, बिपिन सोष्टे, दिलीप जैन, मंगेश तेरडे, विलास नागोठकर, भाऊ मोरे, उल्हास शिंदे, मारुती तटकरे, संजू मोदी, संतोष कोते आदींसह नाना तेरडे यांचे कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता.