धार्मिक सोहळामहाराष्ट्र ग्रामीण

बाळसई येथे श्री. बेलजाई मातेचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न

चाकरमानी आणि माहेरवाशिणी आल्या गावी

बाळसई येथे श्री. बेलजाई मातेचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न

चाकरमानी आणि माहेरवाशिणी आल्या गावी 

दिनेश ठमके 

सुकेळी : नागोठणेजवळील बाळसई गावाची ग्रामदेवता श्री.आई बेलजाई मातेच्या ११ व्या वर्धापनदिनानिमित्त भव्य असा पालखी मिरवणूक सोहळा बुधवारी (दि.२) रोजी अतिशय उत्साहमय वातावरणात संपन्न झाला. पाली येथिल पुरोहित प्रसाद गद्रे व त्यांच्या सहकाऱ्यांकडुन विविध धार्मिक विधी करण्यात आल्या. त्यानंतर महाप्रसाद झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजता श्री.बेलजाई मातेच्या मंदिरातुन बेलजाई मातेच्या पादुकांची फुलांनी सजवलेल्या पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. श्री.बेलजाई मातेचा जयघोष तसेच बेजोंच्या ताळ्यावर नाचण्यात गावातील तरुण – तरुणी, महिला – पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी गावात सर्वत्र आकर्षक रांगोळ्या तसेच प्रत्येकांनी घरासमोर गुढी उभारली होती. या सोहळ्याच्या निमित्ताने नोकरी व्यवसायानिमित्ताने मुंबई – ठाणे व इतरत्र असलेले चाकरमानी तसेच माहेरवाशिणी या पालखी सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होते. हा भक्तिमय रुपातील सोहळा रात्री ९.३० वाजता मंदिरात पोहचला. यावेळी उपस्थितांकडून बेलजाई मातेचा जयघोष करण्यात आल्यानंतर आरती घेण्यात आली. शेवटी या पालखी सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या भक्तांना महाप्रसाद देण्यात आल्यावर नागोठणे मित्र मंडळ यांच्या सुश्राव्य संगीत भजनाने या भव्यदिव्य अशा कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. हा संपुर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी बाळसई गावचे अध्यक्ष मधुकर ठमके यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, बेलजाई मित्र मंडळ मुंबई, बेलजाई क्रिडा मंडळ बाळसई यांनी अपार मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!