धार्मिक सोहळामहाराष्ट्र ग्रामीण
एकलघर – कोंडगाव येथील हनुमान मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन

एकलघर – कोंडगाव येथील हनुमान मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन
नागोठणे (महेश पवार) : नागोठण्याजवळील कोंडगाव ग्रामपंचायत हद्दीतील एकलघर येथील श्री हनुमान मंदिरातील श्री हनुमान मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन गुरुवार दिनांक १० एप्रिल रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वा. या दरम्यान करण्यात आले आहे. एकलघर गावात होणारे या धार्मिक कार्यक्रमासाठी कोंडगाव, पळस पंचक्रोशीसह नागोठणे परिसरातील भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन ग्रामस्थ मंडळ एकलकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.