खेळमहाराष्ट्र ग्रामीण
ग्रामीण प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत भावार्थ इंटरप्राईजेस अमडोशी संघ विजेता
संघमालक सोपानभाऊ जांबेकर यांचे सर्वत्र अभिनंदन

ग्रामीण प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत भावार्थ इंटरप्राईजेस अमडोशी संघ विजेता
संघमालक सोपानभाऊ जांबेकर यांचे सर्वत्र अभिनंदन
महेश पवार
नागोठणे : नागोठणे ग्रामीण विभागातील होतकरू क्रिकेटपटूंना प्रोत्साहन मिळवून देणारे व्यासपीठ ठरलेल्या व ग्रामीण भागात नावाजलेल्या अशा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या ग्रामीण प्रीमियर लीग २०२५ या क्रिकेट स्पर्धेत भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सोपनभाऊ जांबेकर संघमालक असलेला व कर्णधार परेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली भावार्थ इंटरप्राईजेस, अमडोशी हा संघ अंतिम विजेता ठरला. तर वाघळी येथील तुकारामशेठ कदम यांचा केबिजेसी हा संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेत वांगणी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व भाजपाचे रोहा तालुका सरचिटणीस एकनाथदादा ठाकूर यांचा शरयू इंटरप्राईजेस वांगणी आणि शेखरशेठ ठाकूर यांचा स्वराज ११ वांगणी या संघांनी अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांक मिळविला. या चारही संघांना आकर्षक चषक व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत विजेता ठरलेल्या भावार्थ इंटरप्राईजेस, अमडोशी या संघाचे संघमालक व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सोपनभाऊ जांबेकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या क्रिकेट स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज विकास जाधव, उत्कृष्ट गोलंदाज परेश म्हात्रे, मॅन ऑफ द मॅच तेजस बोरकर, मॅन ऑफ द सीरिज परेश म्हात्रे, सिक्सर किंग विकास जाधव, उत्कृष्ट क्षेत्रक्षक नितेश कदम, उगवता सितारा सुजल कदम यांनाही मान्यवरांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले.
या ग्रामीण प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शिवसेनेचे रोहा तालुका उपाध्यक्ष, युवा नेते मनोजदादा खांडेकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी सर्व संघमालक सोपानभाऊ जांबेकर, शेखरशेठ ठाकूर, एकनाथदादा ठाकूर, प्रमोद जांबेकर, प्रल्हादशेठ राणे, तुकाराम शेठ कदम, राकेश शेलार, लहूशेठ तेलंगे तसेच आयोजक ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास गायकर सर्व पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते.