आरोग्य
जिदंल रुग्णालयात इनरलाइट हिलींग शिबिर संपन्न

जिदंल रुग्णालयात इनरलाइट हिलींग शिबिर संपन्न
दिनेश ठमके
नागोठणे : सुकेळी येथिल जिंदल रुग्णालयात बुधवार दि.१६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत एनर्जी हिलींग थेरेपिस्ट रितीका जोशी यांच्या सौजन्याने व साऊथ मुंबई फाउंडेशन आॅफ प्रेनिक हिलींग यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये अनेक नागरीकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
या शिबिरामध्ये एनर्जी हिलींग मार्फत विविध आजारांवरती उपचार करण्यात आले. यामध्ये ब्लड प्रेशर, डायबिटीस, अॅसिडिटीची समस्या, शरीरातील थकवा, हाता – पायामध्ये असणारे दुखणे, अस्थमा, हृदयरोग, मुतखडा अशा अनेक रोगांवरती रुग्णांच्या शरीराला स्पर्श न करता तसेच कोणत्याही प्रकारची औषधे न देता इनरलाइट हिलींग द्वारे उपचार देण्यात आले. या इनरलाइट हिलींग मार्फत केलेल्या उपचारांमुळे शरीरातील सर्व थकवा, शारिरीक व मानसिक समस्यांपासून समाधान मिळत असल्याचे रितीका जोशी यांनी सांगितले.या शिबिरासाठी एनर्जी हिलींग थेरेपिस्ट रितीका जोशी यांच्यासह साऊथ मुंबई फाउंडेशन आॅफ प्रेनिक हिलींगचे अमित चोरघे, गौरी काळोखे, अजिता कोलगावकर, नेहा भगत आदी उपस्थित होते.