धार्मिक सोहळामहाराष्ट्र ग्रामीण

खा. सुनील तटकरेंनी मनोभावे घेतले श्री जोगेश्वरी मातेच्या पालखीचे दर्शन 

सर्वांना मातेचा आशीर्वाद मिळण्यासाठी केली  प्रार्थना 

खा. सुनील तटकरेंनी मनोभावे घेतले श्री जोगेश्वरी मातेच्या पालखीचे दर्शन 

सर्वांना मातेचा आशीर्वाद मिळण्यासाठी केली  प्रार्थना 
 
छ. शिवाजी महाराज चौकातील स्वागताने खा. तटकरे भारावले 
महेश पवार 
नागोठणे : रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांनी नागोठण्याची आराध्य ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता व श्री भैरवनाथ महाराज यांच्या चैत्र पालखी सोहळ्यानिमित्त नागोठण्यातील कोळीवाड्यात रविवारी (दि.१३) रात्री १०.३० वाजता  उपस्थित राहून ग्रामदेवतांचे मनोभावे दर्शन घेतले. खा. सुनील तटकरे यांच्या मनात नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेच्या बद्दल असलेली अपार श्रद्धा व भक्तिभावामुळे खा. तटकरे मातेच्या पालखीचे दर्शन घेतांना मातेच्या चरणी नतमस्तक झाले.  यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी समस्त नागोठणेकरांना व सर्व नागरिकांना मातेचा आशीर्वाद मिळण्यासाठी मातेला साकडे घातले.
 खासदार सुनील तटकरे यांचे नागोठण्यातील छ. शिवाजी महाराज चौकात रात्री १०. १५ वाजण्याच्या सुमारास आगमन होताच चौकात फटाक्यांची मोठी आतषबाजी करण्यात आली. यावेळी खासदार सुनील तटकरे यांच्या स्वागतासाठी खास मुंबईहून आणलेल्या लकी अँड सन्स यांच्या नाशिक ढोल पथकाने लयबद्ध पद्धतीने नाशिक ढोल  वाजवीत आपली अदाकारी सादर केल्याने खासदार सुनील तटकरे या आगळ्या वेगळ्या स्वागत सोहळ्याने भारावून गेल्याचे पहावयास मिळाले.
यावेळी श्री जोगेश्वरी माता देवस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्ष नरेंद्रशेठ जैन, सचिव भाई टके, हरेषशेठ काळे, विलास चौलकर, डॉ. राजेंद्र धात्रक,  बाळासाहेब टके, प्रकाश जैन, अनिल काळे, प्रकाश मोरे, हरेश टके, बिपिन सोष्टे,  उल्हास शिंदे, अतुल काळे,
उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत ताडकर, उपाध्यक्ष संतोष चितळकर, सचिव विवेक देशपांडे, सहसचिव अनिल पवार, सह खजिनदार सतीश पाटील, सुनील लाड, शैलेश रावकर, जितेश म्हात्रे, लोकेश पंडित, संतोष कोते,  किरण काळे, मनोज टके, प्रथमेश काळे, पुनम काळे, चेतन टके, ध्रुव सोष्टे, ॲड. श्रीकांत रावकर, ॲड. रमेश जाधव, सखाराम ताडकर, पवित्र पोलिसानी, डॉ. सनी धात्रक, संतोष कावेडिया, गुड्डू मोदी, श्रीपाल जैन, तात्या पोत्रिक आदींसह उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते. दरम्यान नागोठणे पोलिस ठाण्याचे सपोनि. सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिसांनी पालखी सोहळ्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!