धार्मिक सोहळामहाराष्ट्र ग्रामीण
नागोठणे येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ वा सार्वजनिक जयंती महोत्सव उत्साहात
भिम जयंती महोत्सवाच्या निमित्ताने शहरात दाटून आले निळे आभाळ

नागोठणे येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ वा सार्वजनिक जयंती महोत्सव उत्साहात
भिम जयंती महोत्सवाच्या निमित्ताने शहरात दाटून आले निळे आभाळ
अनिल पवार
नागोठणे : नागोठणे शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ वा सार्वजनिक जयंती महोत्सव नागोठणे शहर व परिसरातील समाज बांधवांकडून शनिवार दि.२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ वा सार्वजनिक जयंती महोत्सवाची सुरुवात शनिवारी सकाळी ९ वा. बुद्ध पुजा पाठ करून बौद्धचार्य श्रामनेर संघ नागोठणे विभागाच्या वतीने पंचशील ध्वजारोहण करून वंदनीय बाबासाहेबांना अभिवादन करून करण्यात आली. तद्नंतर भिम जयंती महोत्सवाच्या निमित्ताने दुपारी ३.३० ते ७ वा. या दरम्यान विश्वशांतीदूत तथागत गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची फुलांनी सजवलेल्या रथातून शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. दरम्यान यावेळी भिम जयंती महोत्सवाच्या निमित्ताने शहरातून काढण्यात आलेल्या या मिरवणूकीत अशोक चक्राची मोहर असलेले निळे ध्वज घेऊन समाज बांधव शेकडो संख्येने सहभागी झाल्याने शहरात निळे आभाळ दाटून आल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

या मिरवणुकीचे शहरातील चौका चौकात स्वागत करण्यात आले. यावेळी नागोठणे सरपंच सुप्रिया संजय महाडिक यांच्यासह सर्व सदस्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर मिरवणुकीचे स्वागत केले. तसेच नागोठणे पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी देखील आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह पोलीस ठाण्याचे वतीने मिरवणुकीचे स्वागत करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार वंदनीय बाबासाहेबांना अभिवादन केले.या महोत्सवात भिम जयंतीनिमित्त विविध प्रबोधनात्मक वैचारिक कार्यक्रम संपन्न झाले. तसेच मिरवणूक सोहळा संपल्यानंतर सायंकाळी बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष एस.एन.गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या जाहीर सभेत प्रमुख वक्ते भारतीय हितकारणी संघ महाराष्ट्रचे संस्थापक/अध्यक्ष डॉ.सिध्दार्थ शिनगारे यांचे बहुजन महापुरुषांच्या जीवन कार्यावर व्याख्यान झाले.

यावेळी नागोठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रिया संजय महाडिक,बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्षएस.एन.गायकवाड, कार्याध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, प्रा.सुनिल देवरे,ग्रामपंचायत सदस्या अमृता महाडिक,शहनाज अधिकारी,शबाना मुल्ला, ज्योती राऊत,पुनम इप्ते, डॉ.श्रीकृष्ण तुपारे, डॉ.विजय चव्हाण,साहिल म्हात्रे,युवा संघाचे अध्यक्ष जितेंद्र गायकवाड,धम्मशिल सावंत,नरेश गायकवाड, बौद्धाचार्य किसन शिर्के,विलास कांबळे,संदिप मोहिते,प्रा.बबन झेंडे, देवता भंडारे आदि मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कांबळे यांनी केले तर सुत्रसंचलन कवी प्रभाकर ओव्हाळ यांनी केले.

दरम्यान भिम जयंती महोत्सवाचे औचित्य साधून जेष्ठ नेते बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष एस.एन. गायकवाड यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. याचबरोबर रात्री ठीक १० वा.महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक अश्विन कुमार निरभवणे आणि पार्टी मुंबई तसेच महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका सीमा खंडागळे,परभणी यांचा प्रबोधनात्मक गीत गायन कार्यक्रम पार पडला.

भिम जयंती महोत्सव कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जयंती महोत्सव कमिटीचे अध्यक्ष संजय जाधव,निलेश शेलार, दिलीप दाभाडे, दिपक दाभाडे,किसन शिर्के, संतोष गायकवाड,आकेश गायकवाड, भगवान बिनेदार,अरविंद गायकवाड, विकास जाधव, काशिनाथ दाभाडे,विलास कांबळे, सतेज दाभाडे, जितेंद्र गायकवाड,देवराम कांबळे, मोरेश्वर सगने,अशोक गायकवाड,मयुर गायकवाड, साहिल जाधव,वृतीक दाभाडे, स्वप्निल मोरे,विजय शिर्के, सुरेश कांबळे, सुमित दाभाडे,दिलीप गायकवाड, स्वप्निल शिर्के,सुजित शेलार, आदी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच भीमशक्ती मित्रमंडळ व रमाई मंडळ आदींसह विभागातील मंडळ यांनी मेहनत घेतली असल्याचे जयंती महोत्सव कमिटीचे अध्यक्ष संजय जाधव यांनी दिली.