धार्मिक सोहळामहाराष्ट्र ग्रामीण

नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता पालखी सोहळा उत्साहात साजरा

६४ तासांनी पालखी मंदिरात 

नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता पालखी सोहळा उत्साहात साजरा

नागोठणे पोलिसांचे विशेष सहकार्य 
६४ तासांनी पालखी मंदिरात 
महेश पवार 
नागोठणे : नागोठणे व मुरावाडी ग्रामस्थांची जागृत, आराध्य ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता व श्री भैरवनाथ महाराजांचा रविवारी  (दि.१३)सकाळी १०.०० वाजता मोठ्या उत्साहात सुरु झालेला चैत्र पालखी सोहळा मंगळवारी मध्य रात्री दोन वाजण्याच्या सुमारास गोंधळ्याच्या साथीने पालखी मंदिरात पोहोचल्यानंतर निर्विघ्नपणे पूर्ण झाला. यावेळी मंदिरात ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावर्षीचा पालखी सोहळा हा गेल्या वर्षीच्या ५२ तासांपेक्षा उशिराने म्हणजेच ६४ तासांनी पूर्ण झाला. रोहाचे पोलिस उपअधीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली नागोठणे पोलिसांकडून लाभलेल्या विशेष सहकार्याने व नागोठणे शहरातील आळी आळीतील सर्व ग्रामस्थांच्या, उत्सव समितीच्या सहकार्याने भक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. 
श्री जोगेश्वरी माता देवस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्ष नरेंद्र जैन, सचिव भाई टके यांच्या मार्गदर्शनाखाली श्री जोगेश्वरी मातेचा पालखी सोहळा आनंदीमय व खेळीमेळीच्या वातावरणात तसेच कोणतेही गालबोट न लावता पार पाडणा-या उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत ताडकर व सर्व उत्सव समितीचा यावेळी श्री जोगेश्वरी माता देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने सचिव भाई टके यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच नागोठण्यातील सर्व ग्रामस्थ मंडळ, गुरव बंधू,  पालखी सोहळ्यास सहकार्य करणारे नागोठणे पोलीस ठाणे, नागोठणे ग्रामपंचायत, सर्व पत्रकार, वीज वितरण कंपनी, हाउसिंग सोसायट्या, नागोठण्यातील अनेक संस्था, संघटना, सामजिक मंडळे या सर्वांचे उत्सव समितीच्या वतीने सत्कार करुन आभार व्यक्त करण्यात आले. 
नागोठणे गावची आराध्य ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता व भैरवनाथ महाराजांच्या चैत्र पालखी सोहळा निर्विघ्नपणे यशस्वी होण्यासाठी श्री जोगेश्वरी माता विश्वस्त समितीचे अध्यक्ष नरेंद्र जैन, सचिव भाई टके यांच्या मार्गदर्शनाखाली श्री जोगेश्वरी माता उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत ताडकर, उपाध्यक्ष संतोष चितळकर, सचिव विवेक देशपांडे,  सहसचिव अनिल पवार, खजिनदार जितू कजबजे, सह खजिनदार सतीश पाटील तसेच कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!