धार्मिक सोहळामहाराष्ट्र ग्रामीण
नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता व श्री भैरवनाथ महाराजांचा उद्या पालखी सोहळा
ग्रामदेवतांचे मुखवटे वाजत गाजत नेले मंदिरात

नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता व श्री भैरवनाथ महाराजांचा उद्या पालखी सोहळा
ग्रामदेवतांचे मुखवटे वाजत गाजत नेले मंदिरात
महेश पवार
नागोठणे : नागोठण्याची आराध्य ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता व श्री भैरवनाथ महाराज यांचा चैत्र पालखी सोहळा उद्या रविवार दि. १३ एप्रिलला सकाळी १० वाजता सुरु होणार आहे. ग्रामदेवतांच्या पालखी सोहळ्या निमित्ताने श्री जोगेश्वरी माता व श्री भैरवनाथ महाराज यांचे मुखवटे व दागिने सुरक्षित ठिकाणावरून श्री जोगेश्वरी माता देवस्थान विश्वस्त समितीचे सचिव भाई टके यांच्या हस्ते श्री जोगेश्वरी मातेच्या मंदिरात आज शनिवारी (दि.१२) सकाळी १० वा. गोंधळ्यांच्या साथीने वाजगाजत नेण्यात आले. यावेळी भाई टके, श्री जोगेश्वरी माता उत्सव समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष चंद्रकांत ताडकर उपाध्यक्ष संतोष चितळकर, सहसचिव अनिल पवार, सह खजिनदार सतीश पाटील कार्यकारिणीत सदस्य विशाल खंडागळे, संतोष सकपाळ, पंकज कामथे, अल्विन नाकते, रोहिदास हातनोलकर, अनंत चितळकर, पांडुरंग कोळी, ऋषिकेश भोय, दिगंबर खराडे, प्रशांत पानकर, मच्छिंद्र साळुंखे, राजेंद्र गुरव, घन:श्याम ताडकर, हरिष टके, सुरेश गिजे, बंधू रावकर, संजय राजिवले, सुभाष ताडकर, मनोज टके, चेतन टके, लोकेश पंडित, दीपाली दिलीप टके, राजश्री हरिष टके, जान्हवी लोकेश पंडित, प्रियांका मनोज टके, पायल चेतन टके, सचिन गांगुर्डे, बबलू खंडागळे, किरण गुरव आदींसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

ग्रामदेवतांच्या चैत्र पालखी सोहळ्याची जय्यत तयारी उत्सव समिती व ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. श्री जोगेश्वरी मातेच्या चैत्र पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता व श्री भैरवनाथ महाराज यांच्या चैत्र पालखी सोहळ्यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक विधी झाल्यानंतर पालखी ग्रामस्थांना व भाविकांना दर्शन देण्यासाठी मंदिरातून मार्गस्थ होणार आहे. पालखी सोहळ्याच्या दिवशी रविवार असल्याने व नंतर सोमवारी आंबेडकर जयंतीची सुट्टी असल्याने नोकरी, व्यवसायानिमित्ताने बाहेरगावी असलेले अनेक चाकरमानी व माहेरवासिनी आपल्या मूळ गावी नागोठण्यात आल्या आहेत.

ग्रामदेवतांच्या पालखी सोहळ्यानिमित्त ग्रामदेवतांचे दर्शन आपल्या घरासमोर होणार असल्याने सर्व नागरिकांमध्ये उत्साहाचे व आनंदी वातवरण निर्माण झाले आहे. पालखीच्या स्वागतासाठी सर्वत्र छोटे छोटे मंडप उभारून विद्युत रोषणाई व पताका लावून आकर्षक सजावट करण्यात आली आहे. महिलावर्ग आपापल्या घरासमोर रांगोळी काढणार असल्याने समस्त महिला वर्ग व सर्व ग्रामस्थ पालखीची आतुरतेने वाट पाहत असताना दिसत आहेत.
दरम्यान ग्रामदेवतांचे मुखवटे व दागिने मंदिरात आणल्यानंतर पुरोहित गणेश सहस्रबुद्धे यांच्या हस्ते ग्रामदेवतांच्या मुखवट्यांची विधिवत पूजा करण्यात आली. नंतर दरवर्षी प्रमाणे होणारी नवग्रह होम पूजा उत्सव समितीचे सहसचिव अनिल पवार व सौ. निकिता पवार यांच्या हस्ते तर श्री सत्यनारायण पूजा उत्सव समितीचे सदस्य मच्छिंद्र साळुंखे व सौ. रेश्मा साळुंखे यांच्या हस्ते संपन्न झाली. त्यानंतर ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने मंदिरात येऊन श्री सत्यनारायण पूजेचे दर्शन घेतले. सायंकाळी मंदिरात संत सेवा मंडळाच्या भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.