धार्मिक सोहळामहाराष्ट्र ग्रामीण

नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेचा पालखी सोहळा उत्साहात सुरु

पालखीचे सर्वत्र जल्लोषात स्वागत : पालखी वेळेत मंदिरात पोहोचण्यासाठी आवाहन 

नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेचा पालखी सोहळा उत्साहात सुरु

पालखीचे सर्वत्र जल्लोषात स्वागत : पालखी वेळेत मंदिरात पोहोचण्यासाठी आवाहन 
महेश पवार 
नागोठणे : नागोठण्याची आराध्य  ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता, भैरवनाथ महाराज व व्याघ्रेश्वर या देवतांचा चैत्र पालखी सोहळा रविवारी (दि.१३) सकाळी १० वा. उत्सव समितीचे सदस्य विशाल खंडागळे यांच्या हस्ते देवीचे मुखवटे विधिवतपणे पालखीत विराजमान केल्यानंतर श्री जोगेश्वरी मंदिरातून मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने तसेच गोंधळ्यांच्या साथीने उत्साहात सुरु झाला. या पालखी सोहळ्यात देवीचे गोंधळी, श्री. चौडेश्वरी दांडपट्टा पथक, कडसुरे, वारकरी सांप्रदाय भजन मंडळ, महाड तालुक्यातील आम्ही दादलीकर लेझीम पथक व दांडपट्टा पथक सहभागी झाल्याने पालखी सोहळ्यात रंगत येत आहे. तर पालखी वेळेत मंदिरात पोहोचण्यासाठी उत्सव समितीसह सर्वजण प्रयत्नशील आहेत. त्यासाठी सर्व ग्रामस्थांना आवाहन करण्यात आले आहे.
पालखी सोहळा सुरू झाल्यानंतर पेण सुधागडचे आमदार रविशेठ पाटील, विधानपरिषदेचे माजी आमदार अनिकेतभाई तटकरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैंकुठशेठ पाटील, पेणच्या माजी नगराध्यक्ष प्रीतमताई पाटील, शिवसेना नेते प्रसाददादा भोईर यांनी पालखी सोहळ्यात सहभागी होऊन मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर पालखी सोहळा ग्रामपंचायत कार्यालय मार्गे बंगलेआळी, कोळीवाडा भागाकडेकडे मार्गस्थ झाला. हा पालखी सोहळा ग्रामस्थांना दर्शनासाठी नागोठण्यातील सर्व भागांतून नेण्यात येणार आहे.

श्री जोगेश्वरी मातेच्या या पालखी सोहळ्यात श्री जोगेश्वरी माता देवस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्ष नरेंद्रशेठ जैन, सचिव भाई टके, शिवसेना नेते (ठाकरे गट)  किशोरभाई जैन, नागोठण्याच्या सरपंच सुप्रियाताई संजय महाडिक, हरेषशेठ काळे, विलास चौलकर, डॉ. राजेंद्र धात्रक, संजयदादा महाडिक,  बाळासाहेब टके, माजी सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, ग्रामसेवक राकेश टेमघरे, हरेश टके, उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत ताडकर, उपाध्यक्ष संतोष चितळकर, सचिव विवेक देशपांडे, सहसचिव अनिल पवार, सह खजिनदार सतीश पाटील, संजय काकडे, प्रथमेश काळे, ग्रामपंचायतीचे सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे, सचिन ठोंबरे, पुनम काळे,  सुप्रिया काकडे, भाविका गिजे, अमृता महाडिक आदींसह उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ यावेळी बहुसंख्येने सहभागी झाले होते. दरम्यान नागोठणे पोलिस ठाण्याचे सपोनि. सचिन कुलकर्णी व पोलिस कर्मचाऱ्यांनी नागोठणे पोलिस ठाण्यासमोर पालखीचे स्वागत करुन दर्शन घेतले.

या  पालखी सोहळ्या निमित्ताने नागोठण्यातील परंतु नोकरी, व्यवसाया निमित्ताने गावाबाहेर असलेले चाकरमानी, ग्रामस्थ आणि माहेरवाशिणी गावात आवर्जून परतल्या आहेत.  श्री जोगेश्वरी मातेच्या या पालखी सोहळ्याच्या  निमित्ताने ग्रामस्थांना घरोघरी मातेचे दर्शन होणार असल्याने मातेच्या स्वागतासाठी सर्वत्र आकर्षक रांगोळी, सजावाटी, विद्युत रोषणाई, तसेच स्वागतकमानी उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण गावात एक आनंदाचे, उत्साहाचे व भक्तिमय वातावरण तयार झाले आहे.

हा पालखी सोहळा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी श्री जोगेश्वरी माता देवस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्ष नरेंद्रशेठ जैन, सचिव भाई टके यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य मेहनत घेत आहेत.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!