धार्मिक सोहळामहाराष्ट्र ग्रामीण

नागोठण्यात सहाव्या किर्तन सोहळ्याचे आयोजन 

विभागातील चाळीस गावांचा सहभाग 

नागोठण्यात सहाव्या किर्तन सोहळ्याचे आयोजन

विभागातील चाळीस गावांचा सहभाग 
महेश पवार                                  
नागोठणे : नागोठणे विभागातील चाळीस गावांचा सहभाग असलेल्या सहाव्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन चाळीस गाव वारकरी सांप्रदाय नागोठणे विभागाच्या वतीने येथील श्री संत ज्ञानेश्वर मंदिर व नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता मंदिरासमोरील प्रांगणात रविवार दि. २७ एप्रिल ते सोमवार दि. २८ एप्रिल या दोन दिवशी करण्यात आले आहे. त्यामुळे विविध व भरगच्च धार्मिक कार्यक्रमांनी आयोजित करण्यात आलेला हा भव्य किर्तन महोत्सव सोहळा रंगणार आहे.
या किर्तन महोत्सवात अखंड हरिनाम, पारायण, हरिपाठ, भजन, कीर्तन, जागरण यांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रविवार दिनांक २७ एप्रिल रोजी सायंकाळी ७ ते ९ वाजता ह. भ. प. भागवताचार्य श्री भगीरथ महाराज काळे यांचे कीर्तन होणार आहे. तर सोमवार दि. २८ एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ वा. दरम्यान ह.भ.प भागवताचार्य भीमरावजी महाराज दराडे शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. हे दोन्ही कीर्तन सोहळे चाळीस गाव वारकरी संप्रदायाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहेत. 
या कीर्तन सोहळ्यात श्री संत ज्ञानेश्वर मंदिरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या नवव्या व बाराव्या अध्यायाचे पारायण होणार आहे. या किर्तन महोत्सवासाठी नागोठणे विभागातील चाळीस गावांतील अनेक दानशुर व्यक्तींनी विविध माध्यमातून सढळ हस्ते व भरभरुन मदत केलेली आहे.
रविवार दिनांक २७ एप्रिल रोजी दुपारचा महाप्रसाद
प्रकाश (घुसुशेठ) जैन, अमित शेट्ये, ह.भ.प. हिराजी महाराज शिंदे, प्रशांत भोईर, निखिल मढवी, पांडुरंग शिंदे, कै. बाळू थिटे यांच्या स्मरणार्थ अनंत थिटे, योगेश म्हात्रे यांच्याकडून…
२७ एप्रिल रोजी रात्रीचा महाप्रसाद
शिवरामभाऊ शिंदे, संजय भोसले, मोरेश्वर तेलंगे, एकनाथ ठाकूर, विजय खाडे, कांचन ठाकूर, ह.भ.प. वसंत भिसे, प्रकाश ज्वेलर्स यांच्याकडून…
तर सोमवार दिनांक २८ एप्रिल रोजी काल्याचा महाप्रसाद उदय जवके, संतोष कोळी, सचिन कळसकर, विनायक गोळे, अतुल काळे, मनोजदादा खांडेकर, सचिन भोसले, ह.भ.प. पांडुरंग रेडेकर यांच्याकडून लाभणार आहे…
हा महोत्सव यशस्वी होण्यासाठी चाळीस गाव वारकरी सांप्रदाय नागोठणे विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मेहनत घेत आहेत अशी माहिती चाळीस गाव वारकरी सांप्रदाय नागोठणे विभागाच्या वतीने ह भ प हिराजी शिंदे यांनी दिली. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!