धार्मिक सोहळामहाराष्ट्र ग्रामीण
निडी येथील श्री काळभैरव महाराज व भवानी माता मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन
निडी गावात तीन दिवस राहणार भक्तिमय वातावरण

निडी येथील श्री काळभैरव महाराज व भवानी माता मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन
निडी गावात तीन दिवस राहणार भक्तिमय वातावरण
महेश पवार
नागोठणे : नागोठण्याजवळील निडी येथील श्री काळभैरव महाराज व भवानी मातेच्या मूर्तींच्या पुर्नप्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या आयोजन मंगळवार दिनांक ८ एप्रिल ते गुरुवार दिनांक १० एप्रिल दरम्यान करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्यामुळे निडी गावात तीन दिवस भक्तिमय वातावरण राहणार असून सर्व चाकरमानी व माहेरवाशिनी गावी येणार असल्याने सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

श्री क्षेत्र निडी येथे तीन दिवस चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्याची सुरुवात मंगळवार दिनांक ८ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता कासू येथील ज्योतिष विशारद, पुरोहित प्रवीण जोशी यांच्याद्वारे सुरू करण्यात येणाऱ्या मूर्ती स्नान व पूजा आरतीने होणार आहे. नंतर सकाळी १० वाजता ग्रामप्रदक्षिणा तर सायंकाळी जलाधिवास व निद्राधिवास या मंगल विधी होणार आहेत. तर रात्री आठ वाजता कालभैरव क्रिकेट क्लब, निडी यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दिनांक ९ एप्रिल रोजी सकाळी ५ ते ६ वाजता काकड आरती, सकाळी ९.३० वाजता श्री गणेश पूजन, पुण्याहवाचन, नवग्रह पूजन, मातृका पूजन, होम हवन, धार्मिक विधी व मूर्ती अभिषेक पुरोहित प्रवीण जोशी व ब्रह्म वृंदाश्रवतीने करण्यात येणार आहेत. सायंकाळी पाच वाजता श्री दत्त सेवा हरिपाठ मंडळ, वरप यांचे हरिपाठ होणार असून सायंकाळी सात वाजता नितेश बाळाराम मढवी यांच्या वतीने गोरक्षक समाज प्रबोधनकार ह. भ. प. कलावतीताई शिवकर (केळवणे – पनवेल) यांचे कीर्तन होणार आहे. याच दिवशी दुपारी नवतरुण मंडळ मुरावाडी तर रात्री वज्रामु ओबिनिंदी यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या धार्मिक सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवार दिनांक १० एप्रिल रोजी सकाळी ५ ते ६ वाजता काकड आरती झाल्यानंतर सकाळी आठ वाजता धार्मिक विधी सुरू होणार आहेत. त्यानंतर सकाळी ९ वाजण्याच्या शुभमुहूर्तावर श्री काळभैरव महाराज व भवानी मातेच्या मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठापना ही महत्वाची धार्मिक विधी होणार आहे. दुपारी एक वाजता मंदिरात श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. तदनंतर कोंडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच निखिल बाळाराम मढवी यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तर सायंकाळी पाच वाजता बालगोपाळ व महिला मंडळ पळस यांचे हरिपाठ होणार असून सायंकाळी सात वाजता बाळाराम मढवी यांच्या वतीने झी टॉकीज टीव्ही शो फेम ह. भ. प. श्री गणेश महाराज डांगे (सांगली) यांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्यात ग्रामस्थ मंडळ निडी व पंचकोशीच्या वतीने रोज रात्री हरिजागर करण्यात येणार आहे.
हा धार्मिक सोहळा यशस्वी होण्यासाठी नियोजन कमिटी मधील बाळाराम मढवी, मधुकर मढवी, धर्मा भोपी, वामन मढवी, नारायण मढवी, गणेश केदारी, किसन मढवी, भगवान मढवी, नथुराम भोय, कृष्णा माळी, मयूर मढवी, रोशन मढवी, विलास मढवी, दीपक मढवी, मोरेश्वर मढवी, नथुराम म्हात्रे, सिताराम माने, उमेश मढवी आदींसह निडी गावातील ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, काळभैरव क्रिकेट क्लब, जय भवानी क्रिकेट क्लब, जय भवानी कबड्डी मंडळ मेहनत घेत आहेत.