महाराष्ट्र ग्रामीणराजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्‍ट्र गौरव रथ यात्रेचे वाकण नाक्यावर उत्स्फूर्त स्वागत 

महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी केले कलशाचे पूजन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्‍ट्र गौरव रथ यात्रेचे वाकण नाक्यावर उत्स्फूर्त स्वागत 

महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी केले कलशाचे पूजन
महेश पवार 
नागोठणे : संपूर्ण राज्यात प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीमध्ये ज्यांनी-ज्यांनी योगदान दिले, त्यांचे स्मरण म्हणून महाराष्ट्र गौरव रथ यात्रेचे आयोजन उपमुख्यमंत्री अजित पवार व खा. सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून व ना. आदितीताई तटकरे व माजी आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणातील सिंधुदुर्ग पासून सुरू करण्यात आले आहे. १ मे रोजी मुंबईमध्ये वरळी येथे या रथयात्रेचा सांगता सोहळा होणार आहे. या रथ यात्रेचे मंगळवारी(दि.२९) नागोठण्याजवळील वाकण नाक्यावर सायंकाळी चार वाजता आगमन होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून या रथ यात्रेचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. यावेळी उपस्थित राष्ट्रवादीचे सर्व नेतेगण, पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला आघाडीच्या पदाधिकारी व इतर महिलांनी यावेळी मंगल कलशाचे पूजन केले. 
यावेळी राष्ट्रवादीचे विभागीय नेते भाई टके शिवरामभाऊ शिंदे, हरेश काळे, विभागीय अध्यक्ष संतोष कोळी, शहर अध्यक्ष बाळासाहेब टके, विभागीय कार्याध्यक्ष सचिन कळसकर, जुगनशेठ जैन, राकेश शिंदे, मयूर दिवेकर, उमेश लोखंडे, अंकुश ताडकर, निवास पवार, अतुल काळे, श्रीकांत रावकर, मनोज ताडकर, तुकाराम राणे, मनोज टके, चेतन टके, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा अमिता शिंदे, जिल्हा सरचिटणीस आशाताई शिर्के, शहर अध्यक्ष सुजाता जवके, सुनीता तटकरे, नागोठणे ग्रामपंचायत सदस्य पुनम काळे, रोशन पारंगे, नरेश भालेकर, मोरेश्वर सगने, संतोष ताडकर, बाळकृष्ण देवरे, नरेश भालेकर, सचिन नेरपगार, घनश्याम ताडकर,
कविता कैलास राणे, सुचिता संतोष राणे, तृप्ती विलास दाभाडे, रोशनी विनोद राणे, करिष्मा मोहन मिणमिणे, प्रदीप मिणमिणे, विजय गायकर, रेश्मा संदीप गायकर, विजय पारंगे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
धार्मिक उत्सवाबरोबरच भक्तीच्या संगमातून संस्कृतीचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडून या मंगल कलश रथ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. 
राज्याचा वैभवशाली इतिहासाचा, सामाजिक समरसतेचा आणि एकात्मतेचा संदेश देणारी ही रथयात्रा असल्याचे मत राष्ट्रवादीचे नागोठणे विभागीय अध्यक्ष संतोषभाई कोळी व नागोठणे  शहर अध्यक्ष बाळासाहेब टके यांनी यावेळी रथ यात्रेचे स्वागत करताना व्यक्त केले. 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने ६५ व्या महाराष्ट्र दिनानिमित्त गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचे मुंबई येथे आयोजन करण्यात आले आहे. या मंगल कलशमध्ये महाडमधील हुतात्मा स्मारक परिसरातील माती तसेच किल्ले रायगडावरील जल व मृदा तसेच गडकिल्ले, ऐतिहासिक वास्तूंची माती, नद्यांचे पाणी एकत्रित करण्यात आले आहे. किल्ले रायगडवरील मातीसह चवदार तळे येथील पाणी

तसेच या गौरव रथयात्रेसाठी रोहा तालुक्यातील जीवनदायीनी कुंडलिका नदीचे जल व स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री स्वर्गीय चिंतामणराव देशमुख आणि स्वाध्याय परिवाराचे प्रणेते, रोह्याचे सुपुत्र पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या स्मृतिस्थळांचे मातीचे कलश गौरव रथयात्रेसाठी अर्पण करण्यात आले असून ते या सजविलेल्या मंगल कलशातून मुंबई येथे रवाना झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसची ही महाराष्ट्र गौरव  मंगल कलश रथ यात्रा वाकण येणार म्हणून यावेळी आवर्जून उपस्थित असलेले नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांचा आज वाढदिवस असल्याने वाकण नाक्यावर उपस्थित सर्वांनी सचिन कुलकर्णी यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!