शैला तुरे ” महाराष्ट्र अभिमान ” पुरस्कार २०२५ ने सन्मानित

शैला तुरे ” महाराष्ट्र अभिमान ” पुरस्कार २०२५ ने सन्मानित
दिनेश ठमके
सुकेळी : पेण तालुक्यातील एका छोट्याशा ग्रामीण भागातील खारपाले गावातील अत्यंत हुशार व होतकरू अशा व्यक्तीमत्व असलेल्या तसेच नेहमीच समाजासाठी झटना-या सौ. शैला प्रमोद तुरे यांना नुकताच ” महाराष्ट्र अभिमान” पुरस्कार २०२५ माता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार रविवार दि.२० एप्रिल २०२५ रोजी कोळशेत ( ठाणे) या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
शैला तुरे यांना याआधिही अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यातील बराच काळावधी हा सामाजिक व देशहीत कार्यासाठी घालवला आहे. त्यांचा नेहमीच जनतेच्या विविंध समस्या सोडविण्यासाठी मोळाचा वाटा असतो. त्यांच्या या कार्याची दखल घेत इंडियन काॅपीराईट प्रोटेक्शन, आपली मुंबई न्यूज चॅनल, निर्मलरत्न चॅरिटेबल ट्रस्ट, दक्ष नागरिक पोलिस मित्र महाराष्ट्र राज्य या संस्थांनी घेतली. या संस्थांनी संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये खारपाले( पेण) येथिल सौ. शैला प्रमोद तुरे यांना ” महाराष्ट्र अभिमान” २०२५ माता जिजाऊ पुरस्काराने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी या कार्यक्रमाला मुंबईचे सेवानिवृत्त डी.सी.पी.सीताराम न्यायनिर्गुणे , अॅन्टीपायरसी सेल मुंबईचे तपाशी अधिकारी रामजीत(जीतु) गुप्ता यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.




