महाराष्ट्र ग्रामीण
वर्षाताई जांबेकर यांना निःस्वार्थ समाजसेविका पुरस्कार प्रदान

वर्षाताई जांबेकर यांना निःस्वार्थ समाजसेविका पुरस्कार प्रदान
महेश पवार
नागोठणे : नागोठण्याजवळील आमडोशी (ता.रोहा) येथील बँक सखी म्हणून बचत गटांना सर्वोत्तम मार्गदर्शन करणाऱ्या सौ. वर्षाताई वासुदेव जांबेकर यांना इंडियन कॉपीराईट प्रोटेक्शन, आपली मुंबई न्यूज व निर्मल रत्न चारिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने राज्यस्तरीय निस्वार्थी समाजसेविका पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

ठाणे येथील लोढा आमरा कोलशेत येथील क्लब हाऊस मध्ये रविवार दिनांक २० एप्रिल रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमात वर्षाताई जांबेकर यांचा हा निःस्वार्थ समाजसेविका पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला कर्नल रवींद्र त्रिपाठी, सिने अभिनेत्री प्राची जैन, प्रसिद्ध अभिनेत्री साक्षी नाईक, मॉडरेटर ज्योती सनवे, सेव्हन वंडर्स रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड दिगंबर तायडे, बांधकाम उद्योगपती अशोक जैन, कायदेशीर सल्लागार – वैद्यकीय मदत पक्ष धनाजी पवार, निवृत्त डीसीपी सिताराम न्यायनिर्गुने, महिला उद्योजक कामिनी भोसले, दक्ष नागरिक पोलीस मित्र महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष राजेश भोसले चार्टर्ड अकाउंटंट वृषभ वोरा, सामाजिक कार्यकर्त्या अनिता गुप्ता आद मान्यवर यावेळी उपस्थित होते.