आंबेवाडी येथिल जानकी लोखंडे यांचे वृद्धापकाळाने निधन

आंबेवाडी येथिल जानकी लोखंडे यांचे वृद्धापकाळाने निधन
दिनेश ठमके
सुकेळी : रोहा तालुक्यातील आंबेवाडी ( कोलाड) येथिल जानकी राम लोखंडे यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी रविवार ( दि. ४) रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने आकस्मित निधन झाले. त्यांच्यावर सोमवार (दि.५) रोजी आंबेवाडी येथिल वैकुंठ भुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या अंत्त्ययात्रेला सामाजिक, राजकीय अशा विविंध क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमला होता.
कै.जानकी लोखंडे यांच्या बाबतीत अल्पपरीचय द्यायचा झाला तर त्यांचा चेहरा हा नेहमीच हसतमुख असायचा. सर्वांशी अगदी प्रेमळ व आपुलकीच्या भावनेने वगायच्या.त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे शेती व्यवसाय करण्यात घालवले . आपल्या सर्व कुंटुबाला चांगल्याप्रकारे वळण लावत एक चांगल्या प्रकारची कुटुंबाची घडी बसवण्यात त्यांचा मोळाचा वाटा होता. अशा या प्रेमळ व मायाळु असलेल्या कै. जानकी यांच्या निधनामुळे संपूर्ण लोखंडे परिवार हा पोरका झाला आहे. त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा, सहा विवाहित मुली, सुन, जावई, नातवंडे, पतवंडे त्याचप्रमाणे मोठा लोखंडे मित्रपरिवार आहे.त्यांचे दशक्रिया विधी मंगळवार ( दि.१३) व उत्तरकार्य गुरुवार ( दि.१५) मे २०२५ रोजी त्यांच्या राहत्या घरी आंबेवाडी येथे होणार असल्याचे लोखंडे कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे.