अपघातमहाराष्ट्र ग्रामीण

अंबा नदीत बुडून परप्रांतीय तरुणाचा मृत्यू 

अंबा नदीत बुडून परप्रांतीय तरुणाचा मृत्यू 

महेश पवार 

नागोठणे : नागोठण्याजवळील वाकण येथील अंबा नदीत बुडाल्याने अभिषेककुमार अवधेश राय (वय २२) रा. उत्तरी थामौन, पो. थामौन, ता. पटोरी, जि. समस्तीपुर (बिहार) सध्या राहणार नागोठणे, ता. रोहा, या परप्रांतीय तरुणाचा मृत्यू होण्याची घटना रविवार दिनांक ११ मे रोजी दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.  

नागोठण्याजवळील सुकेळी येथील जिंदाल समूहाच्या एका कंपनीत कंत्राटी कामगार असलेला हा तरुण आज रविवारची सुट्टी असल्याने वाकण येथील अंबा नदीवर आंघोळीसाठी गेला असता या तरुणाला नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने व त्याला पोहताही येत नसल्याने त्याचा नदीत बुडून मृत्यू झाला. या घटनेची नोंद नागोठणे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी करण्यात आली असून याप्रकरणी अधिक तपास नागोठणे पोलिस करीत आहेत.  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!