अपघातमहाराष्ट्र ग्रामीण

अवकाळी पावसामुळे हेदवलीत गुरांचा गोठा कोसळुन बैलाचा मृत्यू 

अवकाळी पावसामुळे हेदवलीत गुरांचा गोठा कोसळुन बैलाचा मृत्यू 

दिनेश ठमके 
नागोठणे : सद्यपरिस्थितीत अवकाळी पावसाने सर्वच ठिकाणी हाह:कार माजवला असतांनाच नागोठण्याजवळील ऐनघर ग्रामपंचायत हद्दीतील हेदवली गावातील घनश्याम साळवी यांचा गुरांचा गोठा रविवार (दि.२५) रोजी अचानक आलेल्या वादळाने जनावरांच्या अंगावर कोसळुन या दुर्घटनेत एका बैलाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ऐन शेतीच्या हंगामात शेतकरी घनश्याम साळवी यांच्यावर संकट आले असून शासनाकडून त्यांना मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
याबाबतीत उपलब्ध माहितीनुसार हेदवली येथिल शेतकरी घनश्याम साळवी यांनी रविवारी आपली जनावरे नेहमीप्रमाणे गोठ्यात बांधली होती. मात्र रविवारी रात्री अचानक आलेल्या पाऊस व वादळामुळे साळवी यांचा गोठा वा-याच्या प्रचंड वेगाने उडुन जनावरांच्या अंगावर कोसळला. यामध्ये एका बैलाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य नऊ जखमी झालेल्या जनावरांना हेदवली ग्रामस्थांच्या मदतीने सुखरुप बाहेर काढण्यात आले. 
दरम्यान या घटनेत साळवी यांच्या एका बैलाचे व गोठ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ऐन भात पेरणीच्या वेळेसच एका बैलाचा मृत्यू झाल्यामुळे शेतकरी साळवी हे आर्थिक संकटात सापडले आहेत. याबाबतीत शासनाने त्वरित पंचनामा करुन साळवी यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी अशी मागणी बळीराजा शेतकरी सामाजिक संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल लाड व ऐनघर विभागातुन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!