महाराष्ट्र ग्रामीणशैक्षणिक
भाएसो. एस.डी.परमार स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के

भाएसो. एस.डी.परमार स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के
नागोठणे : नागोठण्यातील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या वेलशेत येथील शैक्षणिक संकुलातील एस. डी. परमार इंग्लिश मिडीयम स्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. शाळेचे सर्व १९ विद्यार्थी या परिक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये कु. निल प्रकाश कुथे (८८.०० टक्के) हा विद्यार्थी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला तर कु. अथर्व रविंद्र मेस्त्री (८४.८० टक्के) व कु.करण रविंद्र मनवे (८४.०० टक्के) हे दोन विद्यार्थी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे भा.ए.सो.चे संस्थापक, अध्यक्ष किशोरभाई जैन, शाळा समिती चेअरमन सुरेश जैन, भाएसोचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक जैन व मुख्याध्यापिका अमृता गायकवाड यांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.




