निधनमहाराष्ट्र ग्रामीण
गळफास घेऊन वांगणीतील तरुणीची आत्महत्या
लग्न ठरत नसल्याने आलेल्या नैराश्यातून संपविले जीवन

गळफास घेऊन वांगणीतील तरुणीची आत्महत्या
लग्न ठरत नसल्याने आलेल्या नैराश्यातून संपविले जीवन
नागोठणे : नागोठण्याजवळील वांगणी येथील २५ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दिनांक २० मे रोजी दुपारी घडली आहे. सदर प्रकरणी नागोठणे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
यासंदर्भात उपलब्ध माहितीनुसार सदर तरुणीचे लग्नासंदर्भात गेल्या २-३ वर्षांपासून बोलणी सुरू होती. मात्र तिचे लग्न जमत नसल्याने तिला नैराश्य आले होते. याच नैराश्यातून गेल्या ८–१० दिवसांपासून ती कुणाशी बोलत नव्हती. मंगळवारी दुपारी घरात कुणी नाही हे पाहून सदर तरुणीने नैराश्यातून घरातील हॉल मधील भालाला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दुपारी ४.३० वाजण्यापूर्वी तरुणीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी नागोठणे पोलिस ठाण्याचे सपोनि सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजहंस नागदिवे हे पुढील तपास करीत आहेत.