आरोग्यमहाराष्ट्र ग्रामीण

जिल्हाधिकारी किशन जावळे यांची नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रास अचानक भेट 

आरोग्य केंद्रातील सोयी सुविधांचा घेतला आढावा 

जिल्हाधिकारी किशन जावळे यांची नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रास अचानक भेट 

आरोग्य केंद्रातील सोयी सुविधांचा घेतला आढावा 
आरोग्य केंद्रातील संपादित जागेचा मोबदला लवकरात लवकर देण्याच्या केल्या सूचना 
महेश पवार 
नागोठणे : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचे व मध्यवर्ती प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रास रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सोमवार दिनांक १९ मे रोजी सकाळी ११.३० वाजता अचानक भेट दिली. त्या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील सोयी सुविधांचा आढावा घेऊन रुग्णांशी संवाद साधत संबंधितांना आवश्यक त्या सूचना केल्या.
नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील बाह्य रुग्ण विभाग, शस्त्रक्रिया विभाग, पुरुष व स्त्रि रुग्ण वॉर्ड, औषध विभाग, पॅथॉलॉजी लॅब तसेच आरोग्य केंद्राबाहेरील बाह्य परिसराची पाहणी करून त्याविषयीची सखोल माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. आदित्य शिरसाट यांच्याकडून जाणून घेतली.  नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रवेशद्वार व त्यालगतची काही जागा मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात संपादित होत असली तरी त्याचे मुल्यांकन अद्याप झाले नसल्याने या जागेचा आर्थिक मोबदलाही मिळाला नसल्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वाय. एन. घोटकर यांच्याशी तत्काळ भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्यांना यासंदर्भात आवश्यक त्या सूचना दिल्या.
रायगडचे जिल्हाधिकारी माणगावकडून अलिबागकडे जात असताना त्यांनी नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली त्यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. आदित्य शिरसाट, आरोग्य सहाय्यक राजेंद्र पवार, आरोग्य सहाय्यक भारत मारकड, आरोग्य सहाय्यिका फुलवंती पवार, फार्मसिस्ट अपर्णा साजेकर, शिपाई भाऊ आमडोसकर तसेच ग्रामस्थ वजीर पानसरे व रुग्ण यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!