महाराष्ट्र ग्रामीणशैक्षणिक
कोएसोच्या अग्रवाल विद्यामंदिरचा दहावीचा निकाल ९५.७७ टक्के

कोएसोच्या अग्रवाल विद्यामंदिरचा दहावीचा निकाल ९५.७७ टक्के
नागोठणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.१३) दुपारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यामध्ये कोएसोच्या नागोठण्यातील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलतील गु. रा. अग्रवाल विद्यामंदिरचे इयत्ता दहावीतील १४२ पैकी १३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने शाळेचा शेकडा निकाल ९५.७७ टक्के लागला आहे. शाळेतील कु. स्मित सदानंद मढवी हा विद्यार्थी ९१.२० टक्के गुण मिळवून शाळेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. कु. आदर्श संदीप भोय (९०.२० टक्के) व कुमारी जान्हवी सुनील बैकर (८५.२० टक्के) हे दोन विद्यार्थी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

अग्रवाल विद्यामंदिरच्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे स्थानिक शाळा समितीचे चेअरमन नरेंद्रशेठ जैन, प्राचार्या राधिका ठाकूर, वरिष्ठ लिपिक संतोष गोळे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.