निधनमहाराष्ट्र ग्रामीण

नागोठण्याचे माजी सरपंच लियाकतशेठ कडवेकर यांना पत्नीशोक 

नागोठण्याचे माजी सरपंच लियाकतशेठ कडवेकर यांना पत्नीशोक 

महेश पवार
नागोठणे : नागोठण्यातील खुमाचा नाका येथील रहिवासी हुस्नाबानू लियाकत कडवेकर 
(वय ५९) यांचे शुक्रवारी (दि.२) पहाटे ५ वाजता रोहा येथील जाधव हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान  अल्पशा आजाराने निधन झाले. नागोठणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व नागोठणे एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी  लियाकतशेठ कडवेकर यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती लियाकतशेठ कडवेकर, दोन विवाहित मुली तैमिना व तहसीन, एक अविवाहित मुलगा ताबिश, जावई, नातवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे.
हुस्नाबानू लियाकत कडवेकर या खुपच प्रेमळ,  मनमिळाऊ आणि धार्मिक स्वभावाच्या होत्या.  त्यांनी आपले पती लियाकत कडवेकर यांना राजकारणामध्ये खुपच चांगल्या प्रकारे सहकार्य केले होते. आपले पती राजकारण व समाजकारणात सक्रिय असल्याने लियाकतशेठ कडवेकर यांना कुणीही घरी भेटण्यास आले की, लियाकतशेठ घरी असले नसले तरी घरी  आलेल्या व्यक्तीची विचारपूस करून त्यांना चहापाणी, जेवण यासाठी त्या आवर्जून आग्रह करीत असत. लियाकतशेठ कडवेकर रोहा अष्टमी बँकेचे व बाजार समिती संचालक असताना घरी आलेल्या त्यांच्या सहकारी संचालक व इतर सर्वांना त्यांनी वेळोवेळी उत्तमप्रकारे जेवणाची व्यवस्था केली होती.  कडवेकर कुटुंबात कुणीही व्यक्ती आजारी असो वा कुटुंबात कोणताही कार्यक्रम असो त्यांचा कुटुंबाला मोठा आधार होता. अशाप्रकारे कडवेकर कुटुंबातील एक प्रमुख आधारस्तंभ असलेल्या हुस्नाबानू लियाकत कडवेकर यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 
दरम्यान येथील जामा मस्जिद येथे मोठ्या संख्येने जमलेल्या मुस्लिम बांधवांकडून जनाजाची नमाज अदा करण्यात आल्या नंतर दिवंगत हुस्नाबानू कडवेकर यांच्या पार्थिवावर येथील मुस्लिम समाज कब्रस्तानात शुक्रवारीच सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास दफनविधी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हुस्नाबानू कडवेकर यांचे माहेर असलेल्या नांदगाव (मुरूड) येथील त्यांच्या नातेवाइकांसह नागोठण्यातील मुस्लिम बांधव तसेच लियाकतशेठ कडवेकर यांचे जिल्हाभरातील नातेवाईक, मित्रपरिवार व मुस्लिम बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!