महाराष्ट्र ग्रामीणशैक्षणिक
नागोठण्यातील होली एंजल्स स्कूलचा निकाल १०० टक्के

नागोठण्यातील होली एंजल्स स्कूलचा निकाल १०० टक्के
नागोठणे : नागोठण्यातील नीव सोशियल अँड एज्युकेशन ट्रस्टच्या होली एंजल स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे सर्व ७२ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये कुमारी शिफा अधिकारी ही विद्यार्थीनी ८९.२० टक्के गुण मिळवून पहिली आली आहे. कु. ताहरीम अधिकारी (८९ टक्के) व कु. आफिया खान (८८ टक्के) या विद्यार्थिनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक विजय मुल्कवाड, उपमुख्याध्यापक मुकेश मिसाळ यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.