महाराष्ट्र ग्रामीणशैक्षणिक
नागोठण्यातील कनिष्ठ महाविद्यालयांचे बारावीच्या परीक्षेत यश
यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक

नागोठण्यातील कनिष्ठ महाविद्यालयांचे बारावीच्या परीक्षेत यश
यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र होत आहे कौतुक
कोएसोच्या कै.एस.पी.जैन कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा ९०.३९ % निकाल
नागोठणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल सोमवार दि. ०५ मे २०२५ रोजी दुपारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यामध्ये नागोठणे येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या कै. बापुसाहेब देशपांडे विद्या संकुलातील कै. एस.पी.जैन कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान,वाणिज्य व कला या तिन्ही शाखेचा १२ वीचा एकूण निकाल ९०.३९ टक्के इतका लागला आहे. यामध्ये विज्ञान शाखेचा ९६.८५ टक्के , वाणिज्य शाखेचा ९७.२२ टक्के, तर कला शाखेचा निकाल हा ६३.६३ टक्के इतका लागला आहे.
यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत कोएसोच्या कै.एस.पी. जैन कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान वाणिज्य व कला या तिन्ही शाखा मिळून एकूण ३३३ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते यातून ३०१ विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेतून कु. शर्मा अनु गोपाळ ही विद्यार्थीनी ८६ टक्के गुण मिळवुन प्रथम आली आहे. तर कु.मस्तुद हर्ष विलास ( ७९.५०%), कु.श्रीवर्धनकर सृष्टी दत्ता ( ७८.५०%) हे विद्यार्थी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेत कु.भालेकर मिनाक्षी लक्ष्मण हिने ७६.३३ टक्के गुण मिळवून प्रथम पटकाविला.तर कु. मढवी वेदांती रोहीदास ( ७२.३३%), कु.जांबेकर दिव्या दिपक (७०.८३%) हे विद्यार्थी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. याचबरोबर कला शाखेतून कु. नाईक राणी लक्ष्मण ही विद्यार्थिनी ६२ टक्के गुण प्राप्त करत प्रथम आली तर कु.खंडागळे मानसी विलास (६०%) व कु. भोईर प्रणाली तानाजी (५५.६७%) हे विद्यार्थी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
दरम्यान फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या बोर्ड परीक्षेत कोएसोच्या कै. एस.पी. जैन कनिष्ठ महाविद्यालयातील तिन्ही शाखेतील उत्तीर्ण झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. सिध्दार्थ पाटील,स्थानिक शाळा समितीचे चेअरमन नरेंद्र जैन, प्राचार्या राधिका ठाकूर, वरिष्ठ लिपिक संतोष गोळे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी भरभरून कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
एस.डी. परमार ज्युनिअर कॉलेजचा निकाल ९७.५० टक्के
भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या वेलशेत येथील विद्या संकुलातील एस. डी. परमार इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजने बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले असून कॉलेजचा शस्त्र व वाणिज्य या दोन्ही शाखांचा एकूण निकाल ९७.५० टक्के लागला आहे. कॉलेज मधील दोन्ही शाखेतील ४० पैकी ३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यामध्ये शास्त्र शाखेत ३६ पैकी ३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कु. हर्षल लहारे (६६.१४ टक्के), कु. सत्यम वर्मा (६१.८३ टक्के) व कु. सय्यद इमाझ (६०.६७ टक्के) हे विद्यार्थी पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झाले. तर वाणिज्य शाखेतील चारही विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कु. हानिया शकील हकीम ही विद्यार्थिनी ७९.८३ टक्के गुण मिळवून पहिली आली. तर कु. स्नेहा चटर्जी (५८.३३) व कु. राजकुमार चौधरी (५२.३३ टक्के) हे विद्यार्थी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे भाएसोचे अध्यक्ष किशोर जैन, उपाध्यक्ष संगीता जैन, शाळा समिती चेअरमन सुरेश जैन, भाएसोचे सीईओ कार्तिक जैन, मुख्याध्यापिका अमृता गायकवाड आदींसह सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.
उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा निकाल ८२.१७ टक्के
रोहा तालुक्यातील उर्दू माध्यमाचे एकमेव ज्युनिअर कॉलेज असलेल्या नागोठण्यातील एन.ई.एस.उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने दर वर्षी प्रमाणे यावर्षीही बारावीच्या परीक्षेत ८२.१७ टक्के यश मिळविले आहे. त्यामध्ये कॉलेजच्या कला शाखेचा निकाल ५० टक्के लागला. कला शाखेत यावर्षी एकूण ६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यातून ३ उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये कुमारी मस्यम मेहबूब मकराजी या विद्यार्थिनीने ६७.३३ टक्के गिण मिळऊन कला शाखेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.तर कुमारी आलिया साजिद दाखवे ( ४७.८३ टक्के) व कुमार इब्राहिम हमीद उल्डे (४०.३३) हे दोन विद्यार्थी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
तसेच कॉलेजच्या वाणिज्य शाखेतून एकूण २२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यातून २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये कुमारी मसिरा मुनाफ पित्तू या विद्यार्थिनीने ८४.५० टक्के गुण मिळवून फक्त वाणिज्य शाखेतच नव्हे तर पूर्ण कॉलेज मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर कुमारी तंझिला जावेद पोत्रिक (७०.६१) व कुमारी सारा बिलाल पटेल (६९.१७ टक्के) या विद्यार्थिनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाल्या.
काॅलेजच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन समदशेठ अधिकारी, सचिव लियाकत कडवेकर, व्यवस्थापकीय संचालक सगिर अधिकारी, शब्बीर पानसरे, डॉ.सादिया दफेदार, शाळेचे प्राचार्य व सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने दोन्ही शाखेतून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
रिलायन्स फाऊंडेशन ज्युनिअर कॉलेजचा निकाल १०० टक्के
येथील रिलायन्स फाऊंडेशन स्कूलच्या ज्युनिअर कॉलेज मधील सर्व ४३ विद्यार्थी बारावी शास्त्र शाखेत उत्तीर्ण झाल्याने काॅलेजचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये कु. रितुल श्रीवास्तव ही विद्यार्थीनी ८३.५० टक्के गुण मिळवून पहिली आली आहे. तर कु. मानसी म्हात्रे (७८ टक्के) व कु. सोहम ताडकर (७३.५० टक्के) हे विद्यार्थी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे रिलायन्स फाऊंडेशनच्या स्थानिक शाळा समितीचे अध्यक्ष शशांक गोयल व प्राचार्य योगेश परचुरे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.