महाराष्ट्र ग्रामीणशैक्षणिक
नागोठण्यातील विविध शाळांचे दहावीच्या परीक्षेत यश
गुणवंत विद्यार्थ्यांचे होत आहे कौतुक

नागोठणे ऊर्दू हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के
नागोठणे : रोहा तालुक्यातील ऊर्दू माध्यमाची एक नामांकित शाळा असलेल्या नागोठणे एज्युकेशन सोसायटीच्या उर्दू हायस्कूलचा इयत्ता दहवीचा निकाल १०० टक्के लागला आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२४ परिक्षेला शाळेतर्फे प्रविष्ट झालेले सर्व २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यामध्ये पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांमध्ये कुमारी तैबा अल्ताफ दफेदार (७१.८०%), कुमारी अन्सारी अतिक अहमद (७०.४०%) व कुमारी आफरिन परवीन मो. अक्रम (६९.४०%) यांचा समावेश आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अ.समद अधिकारी, सचिव लियाकत कडवेकर, संचालक सगिर अधिकारी, शब्बीर पानसरे, डॉ.सदिया दफेदार उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक अतिक अन्सारी व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यानी अभिनंदन केले व भविष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.
रिलायन्स फाउंडेशन स्कूलचा १०० टक्के निकाल
नागोठणे : येथील रिलायन्स फाउंडेशन स्कूल या मराठी माध्यम शाळेचे सर्व ४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने शाळेचा निकालही १०० टक्के लागला आहे. यामध्ये कुमारी स्वराली राजेश वडके ही विद्यार्थिनी ९३.४० टक्के गुण मिळवून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तर कु.आज्ञा अशोक भिसे (९२.६० टक्के) व कु.मुग्धा महेश ठाकूर (९१ टक्के) या विद्यार्थिनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे रिलायन्स फाउंडेशनच्या शाळा समितीचे अध्यक्ष शशांक गोयल व प्राचार्य प्रा. योगेश परचुरे यांनी अभिनंदन केले आहे.
पी. एन. पी. एज्युकेशन सोसायटीच्या पळस माध्यमिक शाळेचा निकाल १०० टक्के
नागोठणे : पी. एन. पी. एज्युकेशन सोसायटीच्या नागोठण्याजवळील पळस माध्यमिक शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. या शाळेचे सर्व १४ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. शाळेतील कुमारी आर्या सचिन शेलार ही विद्यार्थिनी ७६ टक्के गुण मिळवून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. तर कुमारी नुपूर गजानन बोरकर (७५.२० टक्के) व कुमारी जानवी घनश्याम ठाकूर (७१ टक्के) या दोन विद्यार्थिनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे स्थानिक शाळा समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, मुख्याध्यापक यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.