गुन्हेगारी वृत्तमहाराष्ट्र ग्रामीण

नेपाळी तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या 

कौंटुबिक नैराश्यातून संपविली जीवन यात्रा 

नेपाळी तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या 

कौंटुबिक नैराश्यातून संपविली जीवन यात्रा
महेश पवार 
नागोठणे : नागोठण्याजवळील सुकेळी येथील मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या एका हॉटेल मध्ये काम करणाऱ्या २० वर्षीय नेपाळी तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. औताल उर्फ सुशांत बी. के. नावाचा हा नेपाळी तरुण मूळचा ऋषीडरा, जिल्हा – तनलू, वॉर्ड क्रमांक ३, नेपाळ येथील रहिवासी आहे. कौंटुबिक कारणातून नैराश्य आल्याने या नेपाळी तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर येत आहे.
यासंदर्भात उपलब्ध माहितीनुसार या नेपाळी तरुणाने यापूर्वी सुकेळी येथील हॉटेल मध्ये चायनीज पदार्थ बनविणारा कूक म्हणून काम केले होते. त्यानंतर एक दीड वर्षांच्या मधल्या काळात त्याने हॉटेल मधील काम सोडल्यानंतर या तरुणाने ८–१० दिवसांपूर्वीच पुन्हा त्याच हॉटेल मध्ये काम सुरू केले होते. या हॉटेलच्या वरील बाजूस टेरेस वर असलेल्या शेड मध्ये हॉटेल कामगारांसाठी तयार करण्यात आलेल्या खोल्यांमध्ये हा नेपाळी तरुण इतर कामगारांसोबत राहत होता. गुरुवारी (दि. १५) रात्री इतर दोन कामगार सहकाऱ्यांसोबत गप्पा झाल्यानंतर हा तरुण त्याच्या खोलीत एकटाच झोपी गेला होता. त्यानंतर मध्यरात्री या तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे.
शुक्रवारी (दि. १६) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हॉटेलच्या टेरेस वरील दुसऱ्या खोलीत असलेला इतर सहकारी कामगार उठल्यानंतर त्याच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी हॉटेलचे मालकांना याविषयी माहिती दिली. नंतर हॉटेल मालकांनी नागोठणे पोलिस ठाण्यात या घटनेची खबर दिल्यानंतर नागोठणे पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून याप्रकरणी अधिक तपास नागोठणे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजहंस नागदिवे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!